• Download App
    Sanjay Raut लाडकी बहीण योजना बंद पडल्याची अफवा पसरवणं संजय राऊतांना भोवलं; मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल!!

    Sanjay Raut : लाडकी बहीण योजना बंद पडल्याची अफवा पसरवणं संजय राऊतांना भोवलं; मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल!!

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडल्याची अफवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पसरवली. त्यावरून त्यांच्या विरोधात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भाजप महिला मोर्चाने राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संजय राऊत यांची वक्तव्ये तपासून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. Sanjay Raut has been accused of spreading rumors about Ladaki Bahin Yojana being discontinued

    संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.


    Ratan Tata : रतन टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


    भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

    4 दिवसांपूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषदेत मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडली आहे, तशीच महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा धादांत खोटा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना व्यवस्थित सुरू आहे. लाभार्थी महिलांना त्या योजनेचा नियमित लाभ मिळत आहे.

    Sanjay Raut has been accused of spreading rumors about Ladaki Bahin Yojana being discontinued

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !