प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार?, याकडे माध्यमांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचा वाघ बाहेर येणार अशा बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र, संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून, स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी या जामिना विरोधात न्यायालयात अपील करणार आहे. Sanjay Raut granted bail, but ED opposes bail
त्यामुळे संजय राऊतांना जामीन तर मंजूर झाला आहे. परंतु ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष न्यायालयात पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. ईडीने केलेल्या स्थगितीच्या मागणीबाबत विशेष न्यायालय 3.00 वाजता आपल निकाल सुनावणार आहे.
काय घडले न्यायालयात ?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना ईडीने अटक केली होती. या दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर, बुधवारी न्यायमू्र्ती देशपांडे यांनी आपला निकाल सुनावला. न्यायालयाने संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला.
ईडीकडून राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. हे छोटेमोठे प्रकरण नसून मोठी नावे यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे.
Sanjay Raut granted bail, but ED opposes bail
महत्वाच्या बातम्या
- राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस
- 18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
- वडिलांच्या पावलावर मुलाचे पाऊल; न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश
- राजकीय नेत्यांच्या (अ)सभ्यतेच्या मर्यादा