विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay raut शरद पवारांच्या निवृत्तीचे संकेत फसवे; संजय राऊत मदतीला धावले!! असेच आज अपेक्षेप्रमाणे घडले. शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत काल शिर्सुफळ येथे भाषण करताना निवृत्तीचे संकेत दिल्याचे बोलले गेले. तशा बातम्या मराठी माध्यमांनी प्रसारित केल्या. परंतु प्रत्यक्षात शरद पवारांनी बारामती वाचवण्यासाठी इमोशनल कार्ड खेळले होते, तेच संजय राऊत आज मदतीला धावल्याने सिद्ध झाले. Sanjay raut
शरद पवारांनी शिर्सुफळ मध्ये बोलताना आपली राज्यसभेत आता दीड वर्षांचीच मुदत शिल्लक राहिली आहे. त्यामुळे इथून पुढे राज्यसभेत जायचे की नाही हे ठरवावे लागेल. आतापर्यंत 14 निवडणूक लढलो तुम्ही सतत निवडून दिले मला कधी घरी पाठवले नाहीत पण मी निवडणूक तर कुठलीच लढवणार नाही, असे सांगून पवारांनी स्वतःच्या निवृत्तीचे संकेत दिले त्याचवेळी बारामतीच्या विकासासाठी नवी पिढी तयार करायची म्हणून युगेंद्र पवारांसाठी मते मागितली. Sanjay raut
मात्र पवारांचे हे इमोशनल कार्ड आहे हे नंतर स्पष्ट झाले. शिवसेनेचे प्रवक्ते आणि पवारांचे कट्टर समर्थक संजय राऊत यांच्या मदतीला धावले आजच्या नियमित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शरद पवार नेहमीच निवृत्तीची भाषा बोलतात. त्यांनी काल काही नवे सांगितले नाही, पण आम्हाला त्यांच्यासारख्या मार्गदर्शकाची गरज आहे. त्यांच्यासारखे सेनापती आम्हाला हवे आहेत. त्यांनी पाठीवर हात ठेवून लढ म्हणावे, असे सांगितले. शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत देऊन आपल्या समर्थकांना “जागे” केले आणि अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांच्या मदतीला धावले हेच यातून दिसून आले. Sanjay raut
Sanjay raut “exposed” pawar retirement plans
महत्वाच्या बातम्या
- Nandankanan : भारतीय रेल्वेशी संबंधित मोठी बातमी! नंदनकानन एक्स्प्रेसवर गोळीबार, दहशतीचे वातावरण
- Sanjay Verma :संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती!
- Jaishankar : जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले; हिंदू आणि मंदिरांवरील हल्ल्यांवर जोरदार टीका केली
- Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!