वृत्तसंस्था
मुंबई : 1034 कोटी रूपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सक्तवसुली संचालनालय स्थापिली अर्थात ईडी संपत्ती जप्तीची कारवाई केल्यानंतर संजय राऊत प्रचंड संतापले असून त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर “च्युत्या” या शब्दात टीका केली आहे. त्याचबरोबर ईडीने कोणतीही नोटीस न देता आपल्यावर कारवाई केल्याचे केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी अधिकार्यांवर पुन्हा तेच जुने आरोप केले आहेत. “असत्यमेव जयते”, असे ट्विट करून संजय राऊत यांनी ही सूडाची कारवाई आहे. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी संजय राऊतने मदत केली नाही म्हणून भाजपच्या हातातली खेळणी आमच्यावर सोडली आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut ED Action: After property confiscation, Sanjay Raut erupted on ED-BJP
अलिबाग मधले आठ भूखंड हे 2009 मध्ये खरेदी केल्याचे तसेच दादरचा फ्लॅटमध्ये माझे कुटुंबीय राहत होते. त्याचा अवैध संपत्ती वगैरेशी काहीही संबंध नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. प्रत्यक्षात ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित कायदेशीर कारवाई या केल्या आहेत. या कायदेशीर कारवाई अंतर्गत संजय राऊत यांची अलिबाग येथील आठ भूखंडांची जमीन आणि दादर मधला फ्लॅट जप्त केला आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.
ईडी स्वतःची खबर खोदत आहे. आज महात्मा गांधी यांची पुन्हा हत्या झाली आहे. आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन. असत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.
Sanjay Raut ED Action: After property confiscation, Sanjay Raut erupted on ED-BJP
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!!
- Sanjay Raut ED Action : संजय राऊतांची मुंबईतला फ्लॅट आणि अलिबागमधली जमीन ईडीकडून जप्त!!
- Congress Ahmad Patel : अहमद पटेलांचा मुलगा फैजल काँग्रेस हायकमांड वर नाराज; वाटचाल “आप”च्या दिशेने!!
- लष्करी शेती अन् दुग्धशाळा आता होणार इतिहासात जमा; शेकटकर समितीने केली होती शिफारस