विशेष प्रतिनिधी
पुणे : खरी शिवसेना म्हणून आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलो, तरी आता पहिली पसंती शिवसेनेला द्या. कारण इतरांच्या पालख्या शिवसैनिकांनी खूप वाहिल्या, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत पुण्यातून काडी टाकली. Shivsena first, Sanjay Raut creates rift in MVA
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रीडा मंचावर झाला. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या समोरच महाविकास आघाडीत काडी टाकली.
उद्धवजींच्या हसण्यामुळे लागली आग
माझ्यासमोर बॉस बसला आहे आणि मला बोलायला लावत आहात. वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं गर्जना करा. उद्धवजी हसत आहेत. मी एका ओळीत त्यांच्या हसण्याचा अर्थ काय आहे. ये हसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है. महाराष्ट्रात सध्या जी आग लागली आहे. ती उद्धवजींच्या हसण्यामुळे लागली आहे. एवढं घडत आहे. संकटावर संकट येत आहे, संघर्ष होत आहे. कोंडी केली जात आहे. पण आमचा नेता हसत संकटाला सामना देत आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देत आहेत. समोर जो जळफळाट सुरू आहे, त्याचं कारण उद्धवजींचं हास्य आहे, असे संजय राऊत म्हणाले.
कोणत्या जागा लढायच्या त्याची यादी तयार आहे. आपल्याला विचारलं पुण्यात कोणत्या जागा लढणार, पुणे, मावळ आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेल्या २५ ते ३० वर्षात या प्रत्येक जागेवर शिवसेनेचा आमदार कधी ना कधी निवडून आला आहे. तुम्ही एकदोन जागा घेऊ नका.
गेल्या काही वर्षात शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालखा खूप वाहिल्या. आता स्वत:साठी लढायचे आहे. कधी भाजपसाठी पालखी वाहिली. त्यांचे आमदार निवडून आणले. कसब्यात कष्ट करून काँग्रेसचा विजय केला. बारामतीत सुप्रिया ताईंसाठी शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. पण उद्याच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी आपल्या स्वतःकडे पाहिले पाहिजे. आपण महाविकास आघाडीत असलो तरी आपली पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत. हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा मेळावा आहे, असे संजय राऊतांनी शिवसैनिकांना निक्षून सांगितले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नंबर गेमला नव्याने सुरुवात झाली.
Sanjay Raut creates rift in MVA
महत्वाच्या बातम्या
- Dharmaraobaba atram : पक्ष आणि घरफोडीवरून धर्मरावबाबा अत्राम पवारांवर बरसले, पण प्रफुल्ल पटेल पवारांना सावरायला धावले!!
- पोस्टरवरचे मुख्यमंत्री “खाली” आले; पण स्वतःच्याच मंत्रिपदाची घोषणा करून बसले!!
- Kangana Ranaut :’राहुल गांधींच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो’, कंगना रणौत यांनी लगावला टोला!
- Paris Olympics : हॉकीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभव