विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या दंडात सर्व्हेचे “बळ”; बेटकुळ्या उडाल्या 40 + जागांवर!!, असे म्हणायची वेळ महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्याच वक्तव्याने आली आहे. Sanjay raut claims MVA will win 40 + seats in loksabha elections
एबीपी आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात ठाकरे पवारांच्या महाविकास आघाडीला 41 % मते मिळण्याचे भाकीत वर्तवून 26 जागांवर विजयी होण्याचा दावाही करण्यात आला आहे. त्या उलट भाजप – शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला 37% मतांसह 19 ते 21 जागांवर समाधान मानावे लागेल, असे चिन्ह दाखविले आहे. त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दंडात या सर्वेक्षणाचे बळ आले आहे, पण या बळातूनच आघाडीच्या नेत्यांच्या वक्तव्याच्या बेटकुळ्यांनी 40 + जागांच्या वर उड्या मारल्या आहेत.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी 26 जागा नव्हे, तर 40 पेक्षा जास्त जागा जिंकून घेईल, असा दावा केला आहे. महाराष्ट्रात फक्त ठाकरे – पवार पॅटर्न चालेल. मंबाजी – तुंबाजी पॅटर्न चालणार नाही. आत्ता जो सर्व्हे आला आहे, तो फक्त पहिल्याच टप्प्यातला आहे. भाजप हवेतला पक्ष आहे. तो जमिनीवरचा पक्ष नाही. तो एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांवर उभा राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी 45 + जागा जिंकण्याचा दावा करू नये. महाराष्ट्रात 40 + जागा जिंकण्याची फक्त आमचीच क्षमता आहे आणि आम्ही त्या जिंकून दाखवू असा दावाही संजय राऊत यांनी केला.
अजितदादांनी खोडला दावा
अजित पवारांनी मात्र हा दावा पूर्णपणे खोडून काढला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व समोर टिकेल, असे कोणतेही नेतृत्व आत्ता उभे नाही. लोक मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आणि महाराष्ट्रातही महायुतीलाच बहुमत मिळणार, मग ते सर्व्हे काहीही म्हणोत. अनेक सर्व्हे खोटे ठरल्याचे आपण पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले
Sanjay raut claims MVA will win 40 + seats in loksabha elections
महत्वाच्या बातम्या
- मध्य प्रदेशात आज डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; दुपारी 3:30 वाजता शपथविधी सोहळा
- बिहारचे मुस्लिम फक्त ‘आरजेडी’लाच का मतदान करतात? प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण, म्हणाले….
- बिहारचे मुस्लिम फक्त ‘आरजेडी’लाच का मतदान करतात? प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण, म्हणाले….
- भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच कसोटीत केलं पराभूत