विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय आणि महाविकास आघाडीचा दारूण पराभव मान्य नसलेल्या संजय राऊत यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढलं आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचे खापर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर फोडलं!!
कालपासून संजय राऊत यांनी एकच धोषा लावला आहे, आम्हाला पराभव मान्य नाही!! केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला विषारी प्रचार यामुळे हा विश्वासनीय आणि अनाकलनीय पराभव झाला असा आरोप राऊत यांनी केला होता.
पण आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर घसरले. मतदान महाराष्ट्राच्या जनतेने केले. महायुतीचा विजय महाराष्ट्राच्या जनतेने घडवून आणला. त्यात महाविकास आघाडीचा पराभव झाला पण महाविकास आघाडीच्या पराभवाला धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याचा अजब आरोप राऊत यांनी केला.
धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश असताना शिवसेनेच्या अपात्र आमदारांसंदर्भात वेळेत निर्णय दिला नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रातला घटनाक्रम बिघडत गेला. त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या पराभवात परावर्तित झाला, यांनी अपात्र आमदारांसंदर्भात वेळीच निर्णय दिला असता तर आत्ताची परिस्थिती उद्भवलीच नसती. पण धनंजय चंद्रचूड यांनी पक्षांतराच्या दारं खिडक्या उघडी ठेवून ते निघून गेले, असा दावा संजय राऊत यांनी केला. अन्यथा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी असा कोणता तीर मारला होता की त्यांना 57 आणि 41 एवढ्या प्रचंड जागा मिळाव्यात??, असा सवाल राऊत यांनी केला.
Sanjay raut blamed d.y.chandrachud for MVA defeat
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- Devendra Fadnavis आधी पक्षांतर्गत नेता, मग मुख्यमंत्री निवडू; उतावीळ माध्यमांना फडणवीसांनी सांगितली पुढची प्रक्रिया
- Uddhav Thackeray उद्धव ठाकरे म्हणाले- हा अनपेक्षित निकाल, जनतेने कोणत्या रागातून महायुतीला मते दिली कळत नाही!!