• Download App
    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून संजय राऊतांनी त्यांना उतरवले राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत Sanjay raut batting for Uddhav Thackeray's national leadership

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून संजय राऊतांनी त्यांना उतरवले राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज आणि उद्या राजधानी दिल्लीत राहून आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा खुंटा बळकट करत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरवले आहे. Sanjay raut batting for Uddhav Thackeray’s national leadership

    संजय राऊत यांनी आपल्या खास अंदाजात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय नेतृत्व करावे. तो दिवस फार दूर नाही, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.

    महाविकास आघाडीची स्थापना होत असताना उद्धव ठाकरे यांची काही वक्तव्ये तसेच त्यांच्या अन्य राजकीय हालचालींची यामध्ये माहिती आहे. उद्धव ठाकरे यांची वाटचाल राष्ट्रीय नेतृत्वाकडे चालल्याचे यातून संजय राऊत यांनी निदर्शनास आणले आहे. “अखंड साथ, अतूट नाते” राष्ट्राचे नेतृत्व करण्याची आपल्यात क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    एकीकडे पश्चिम बंगालचे राज्य दोन तृतीयांश बहुमताने जिंकून ममता बॅनर्जी राष्ट्रीय नेतृत्वावर आपली मोहोर उमटवत आहेत. आज दिवसभर त्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उद्या त्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी केलेले ट्विट “राजकीय सूचक” आहे.

    Sanjay raut batting for Uddhav Thackeray’s national leadership

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य

    Raj Thackeray जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले; राज ठाकरेंनी टाइम्स सकट मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले!!

    Kokate : कृषिमंत्री कोकाटेंची विधिमंडळात माहिती- पीक विमा योजनेतून कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी