विशेष प्रतिनिधी
मालेगाव : Dada Bhuse मालेगाव येथील न्यायालयात शनिवारी घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली.Dada Bhuse
संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी मान्य केले. आम्हा दोघांना न्यायालयाने पहिले, विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.Dada Bhuse
दादा भुसे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रुनुकसानीचा दावा मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम, तसेच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता संपला आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले.
वादाची पार्श्वभूमी 178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याशी संबंधित होती. संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली
यावेळी दादा भुसे यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवून हा वाद निर्माण केला. ज्यांच्याकडून माहिती आली तेही आता दुसऱ्या पक्षात गेले असल्याचे सूचक विधान करण्यात आले. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. मात्र राऊत यांनी स्वतः आरोप मागे घेतल्याने आणि खोटेपणा मान्य केल्याने पुढील कारवाईची गरज उरली नसल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य
संजय राऊत यांनीही दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हणत विषयाला मैत्रीपूर्ण शेवट दिला. राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक पातळीवर संवाद आणि समज कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सत्ता पक्षात दोघेही वेगवेगळ्या टप्प्यांवर असले तरी वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एकंदरीत, न्यायालयात सुरू झालेला हा वाद अखेर समझोत्याने मिटला. आरोप, प्रत्यारोप, खटला आणि दंड या सगळ्या प्रक्रियेनंतर दोन्ही नेते एकत्र येत विषय समाप्त झाल्याची घोषणा करताना दिसले. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. त्यामुळे आता हा राजकीय वाद अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sanjay Raut Apologizes to Dada Bhuse; Defamation Case Withdrawn in Malegaon Court
महत्वाच्या बातम्या
- Macron : फ्रेंच राष्ट्राध्यक्ष म्हणाले- आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आदर आवश्यक, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रायव्हेट मेसेज लीक केले होते
- BLA : बलुच लढवय्यांच्या कैदेत पाकिस्तानी सैनिक रडताना दिसले, म्हणाले- आम्ही देशासाठी लढतो, पण सरकारला पर्वा नाही
- Priyanka Gandhi : प्रियंका गांधी म्हणाल्या- गौरव गोगोई योग्य मार्गावर, हिमंता निवडणुकीला घाबरले, म्हणून आरोप
- पिंपरी-चिंचवडमध्ये “अजित सृष्टी”उभारणीला महापालिकेची मंजुरी; भाजप आमदार महेश लांडगेंचा पुढाकार