विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची सत्ता जाऊन आता दीड वर्ष होत आले तरी अजून आघाडीतल्या नेत्यांचे फ्रट्रस्टेशन काही संपत नाही. उलट अजित पवार सत्तेला जाऊन मिळाले आणि त्या पाठोपाठ वेगवेगळ्या घोटाळ्यांचे एकापाठोपाठ एक खुलासे झाले, त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या तोंडून मातेरे – पोतेरे – वाटोळे, असे शब्दांचे भेंडोळे बाहेर पडत आहेत. Sanjay raut and jitendra awhad used abusive language against devendra fadnavis and Anna hazare
आता हेच पहा ना :
काल इंडिया टुडे कन्क्लेव्हच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवार यांचीच होती, असे सांगून पवारांना एक्सपोस केले. पवारांना भाजपबरोबर यायचे होते, पण त्यांना लगेच यू टर्न घेता येत नव्हता म्हणून त्यांना थोडा वेळ हवा होता. म्हणून त्यांनीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची सूचना केली होती, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
तो गौप्यस्फोट अर्थातच पवारांनी नेहमीप्रमाणे नाकारला, पण फडणवीसांच्या गप्पेस्फोटामुळे संजय राऊत चिडले आणि ते फडणवीस यांना मातेरे आणि पोतेरे म्हणून बसले. देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी मातेरे आणि पोतेरे केले आहे. त्यांच्या एवढा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, अशी आगपाखड संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांची कोणतीही आगपाखड तशी नवी नाही. ते दररोज सकाळी 9.00 वाजताच्या पत्रकार परिषदेत गेली 4 वर्ष वर्षे तेच करत आहेत.
पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कडून फ्रंट फूटवर खेळणारे जितेंद्र आव्हाड मात्र सध्या बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहेत. ते सध्या ठाणे केंद्रित राजकारण करून तिथल्यापुरतेच बोलत असल्याच्या बातम्या आढळतात.
पण आज अचानक जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा “महाराष्ट्रव्यापी” आणि “देशव्यापी” झाले आणि ते थेट अण्णा हजारेंना टार्गेट करून बसले. आव्हाडांच्या किंबहुना राष्ट्रवादीच्या जुन्या जखमेवरची खपली निघाली. त्यामुळे अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी, “या माणसाने देशाचे वाटोळे केले, नुसती टोपी घालून कोणी गांधी होत नाही”, असे ट्विट केले.
अण्णा हजारे यांनी नेहमीच शरद पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून टीका केली. सर्वात भ्रष्ट राजकारणी असे बिरुदच त्यांनी पवारांवर चिकटवले होते. नेमकी हीच जखम उफाळून आली आणि आव्हाडांनी अण्णा हजारेंवर देशाचे वाटोळे केल्याचा ठपका ठेवला. 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचारा विरोधात मोठे आंदोलन उभारले. त्याला प्रचंड जनसमर्थन मिळाले आणि 2014 मध्ये काँग्रेस पर्यंत यूपीएची सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. त्याचा सल अजूनही जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात बोचते आहे आणि तीच सल आव्हाडांच्या ट्विटमधून अण्णा हजारेंवर आगपाखड करत बाहेर आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज मातेरे – पोतरे आणि वाटोळे या शब्दांची चर्चा रंगली आहे.
Sanjay raut and jitendra awhad used abusive language against devendra fadnavis and Anna hazare
महत्वाच्या बातम्या
- पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास; कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!
- Bihar Caste Survey : “जात जनगणनेची आकडेवारी पूर्णपणे खोटी, माझ्या घरापर्यंत कोणीही पोहोचले नाही”
- टीव्ही-कॉम्प्युटर स्क्रीनला एलईडी तंत्रज्ञान प्रदान करणाऱ्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
- LCA Tejas : हवाई दलाला मिळाले पहिले ‘LCA Tejas’ विमान; जाणून घ्या, खास वैशिष्ट्ये