विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून काँग्रेस नेतृत्वाला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पण तो राजीनामा बाजूला ठेवत मुंबई प्रदेश काँग्रेसने त्यांना निलंबित करून टाकले. संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.Sanjay Nirupam’s resignation letter aside, his suspension from Congress!!
मुंबईतली काँग्रेस नामशेष असल्याचे पाहवत नाही काँग्रेस नेतृत्वाने शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे नेतृत्व पुढे झोपू नये मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा देऊ नयेत अशी मागणी संजय निरुपम करत होते महाविकास आघाडी राहिल्याने काँग्रेसचेच नुकसान होते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना ठाकरे गटाने शरद पवारांचे राष्ट्रवादी बळकट होते असे संजय निरुपम वारंवार सांगत होते. मात्र संजय निरुपम यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे पक्ष शिस्तीचा भंग असे लेबल लावत होते
संजय निरुपम यांनी काल रात्रीच काँग्रेस पक्षाकडे राजीनामा पत्र पाठवून दिले. पण ते पत्र बाजूला ठेवून मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने संजय निरुपम यांना पक्षातून निलंबित केले. यातली विसंगती संजय निरुपम यांच्या ट्विटमधून समोर आणली. मी दिलेले राजीनामा पत्र पक्षापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तो राजीनामा स्वीकारणे पक्षाला अपरिहार्य झाल्या असते म्हणून माझ्या पत्राकडे दुर्लक्ष करून मला निलंबित केल्याचे पत्र काँग्रेसने प्रसृत केले, असे संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये नमूद केले. संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Sanjay Nirupam’s resignation letter aside, his suspension from Congress!!
महत्वाच्या बातम्या
- तब्बल 22 उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी उभा केला भाजप विरोधात लढा; पण पवार फक्त 5 जागांचा का नाही सोडवू शकत तिढा??
- अयोध्येने ‘या’ बाबतीत मक्का आणि व्हॅटिकन सिटीला टाकले मागे!
- हेमा मालिनींच्या उमेदवारी पुढे शस्त्रे टाकत बॉक्सर विजेंदर मथुरेच्या बाजारातून थेट भाजपच्या गोटात!!
- पोलिस भरती परीक्षा प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव मिश्रा याला नोएडा STFने केली अटक