• Download App
    संजय निरुपम यांची लवकरच शिवसेनेत घरवापसी होणार! Sanjay Nirupam will soon return to Shiv Sena

    संजय निरुपम यांची लवकरच शिवसेनेत घरवापसी होणार!

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश Sanjay Nirupam will soon return to Shiv Sena

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले संजय निरुपम हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. निरुपम यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    2009 च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यात त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा थोडय़ा फरकाने पराभव केला. मात्र, 2014 मध्ये त्यांना याच मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर निरुपम यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.


    संजय निरुपम यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी; दिवसभरात स्टार प्रचारकांच्या यादीतून काढले होते


    त्यांनी अनेक वर्षे शिवसेनेत विविध पदांवर काम केले आहे. काँग्रेसने गेल्या महिन्यात निरुपम यांची अनुशासनहीनता आणि पक्षविरोधी वक्तव्य केल्याबद्दल सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सांगितले.

    मूळचे बिहारचे असलेले निरुपम यांनी 1990 च्या दशकात पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या काळात संजय निरुपम शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक झाले. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी त्यांना 1996 मध्ये राज्यसभेवर पाठवले.

    मात्र, 2005 मध्ये त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व सोडण्यास सांगण्यात आल्याने त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर मतभेद वाढले आणि निरुपम यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांची गेल्या महिन्यात काँग्रेसने हकालपट्टी केली होती.

    Sanjay Nirupam will soon return to Shiv Sena

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस