विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Sanjay Gaikwadकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. Sanjay Gaikwad
आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे.
गायकवाड Sanjay Gaikwad म्हणाले, संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब जनता जगू शकत नव्हती, त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, हक्क नव्हता. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी आदी समाजाला आरक्षण दिलं. आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे. महायुती संविधान बदलणार आहे, त्यामुळे आता आरक्षण संपणार आहे, अशा बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजासह ओबीसी समाजाची दिशाभूल केली.
आता राहुल गांधी या देशात आरक्षण संपण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. तुमचा खरा चेहरा आज लोकांच्या समोर आलेला आहे. मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागत आहे. त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता आरक्षण संपवणार आहे, असं सांगता. आरक्षण संपवण्याची भाषा तुम्ही करून राहिले. मागासवर्गीय आरक्षण तुम्ही संपवणार, यापुढं कोणी असो बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्याची जीभ हासडल्या जाईल, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर दिला आहे.
MLA Sanjay Gaikwad’s controversial statement
महत्वाच्या बातम्या
- Arvind Kejriwals : ‘दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
- Prashant Kishore : प्रशांत किशोर यांनी घेतली शपथ, म्हणाले ‘सत्तेवर येताच हे निर्बंध….’
- Tejas Mark-2 : हवाई दलाला मिळणार नवी ताकद! 2025 मध्ये तेजस मार्क-2 घेऊ शकते पहिले उड्डाण
- Kejriwal & Thackeray : मोदींची तिसऱ्या टर्मची सत्ता उद्ध्वस्त करण्याचे पाहिले स्वप्न; पण दोन मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला लागला सुरुंग!!