नाशिक : संग्राम थोपटे यांना काँग्रेसने दिले तोकडे बळ, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; त्यामुळे संग्राम थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!, ही खऱ्या अर्थाने संग्राम थोपटे यांच्या पक्षांतराची सत्य कहाणी आहे. संग्राम थोपटे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती असून 22 एप्रिलला मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली आहे. Sangram thopte
वास्तविक अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे हे हाडाचे काँग्रेसजन. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंख्य वादळे आणि पक्षांतरे झाली, तरी देखील अनंतराव थोपटे आणि त्यांचे चिरंजीव संग्राम यांनी कधीही पक्षांतराचा विचार मनात आणला नाही. उलट शरद पवारांनी निर्माण केलेल्या प्रत्येक राजकीय वादळाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी भोर तालुक्यात बुलंद ठेवला होता. शरद पवारांनी थोपटे पिता – पुत्रांना खऱ्या अर्थाने राजकारणात कधीच मदत केली नाही. उलट सातत्याने विरोधच केला. अगदी 2019 ते 2024 दरम्यान संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष पद मिळण्याची संधी प्राप्त झाली असताना तिच्यामध्ये खोडा घालण्याचे काम पवारांच्या त्या वेळच्या अखंड राष्ट्रवादीने केले होते. संग्राम थोपटे यांना काँग्रेसच्या हक्काचे विधानसभेचे अध्यक्ष पद पवारांनी मिळून दिले नव्हते.
पण 2023 मध्ये राजकीय चक्रे अशी फिरली, की वर्षानुवर्षे राजकीय वैरभाव जोपासलेल्या शरद पवारांना अनंतराव थोपटे यांच्या भोर मधल्या घराचा उंबरठा झिजवावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी स्वतः शरद पवार यांना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागला होता. त्यातच शरद पवारांना अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांना मदत करा, अशी याचना करावी लागली होती. अनंतरावांनी दिलदारपणे जुने राजकीय वैर विसरून सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना मदत केली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून 75000 मतांनी का होईना पण निवडून येऊ शकल्या. यात थोर मतदारसंघातल्या लीडचा वाटा केवळ अनंतराव आणि संग्राम थोपटे यांच्यामुळे मिळाला होता.Sangram thopte
पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना केलेल्या मदतीची बूज राखली नाही. संग्राम थोपटे यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भोर मतदारसंघात पुरेशी मदत केली नाही. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या शंकर मांडेकरांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने मदत केली. त्यामुळे संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून 19 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.Sangram thopte
काँग्रेसने दिलेले तोकडे बळ आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे केलेला विश्वासघात, यामुळे संग्राम थोपटे यांना भोर तालुक्यामध्ये आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपचा पर्याय निवडावा लागलाय. ही केवळ काँग्रेस मधली बंडखोरी नाही, तर ती शरद पवारांच्या विश्वासघाताच्या विरोधातली बंडखोरी आहे, असेच याचे वर्णन करावे लागेल. कारण संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीत ते कमळ चिन्ह वरचे उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात पवारांची अखंड किंवा विभाजित राष्ट्रवादी उमेदवार देईल, हीच दाट शक्यता दिसून येते.
Sangram thopte to join BJP, but it’s rebellion against Sharad Pawar’s NCP
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का!