Tuesday, 13 May 2025
  • Download App
    सांगली : रेशन धान्यात सापडले किडे आणि माती । Sangli: Insects and soil found in ration grains

    सांगली : रेशन धान्यात सापडले किडे आणि माती

    दुकानदारांना विचारणा केल्यास ‘आमच्या घरात पिकते का, न्यायचे असेल तर न्या नाहीतर जा’, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. Sangli: Insects and soil found in ration grains


    विशेष प्रतिनिधी

    सांगली : सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत व शहरांमध्ये रेशन धान्य दुकानांमधून किडके धान्य वाटप होत असल्याच्या तक्रारी आहेत.दरम्यान कोरोना काळात वाळवा तालुक्यातील काही रेशन धान्य दुकानांतून निकृष्ट प्रकारचे धान्य वाटप होत असे. हे धान्य न घेणार्‍या लाभार्थ्यांबरोबर दुकानदार वाद घालत असत.

    लॉकडाऊन असल्याने मिळेल ते धान्य स्वीकारणे एवढेच सर्वसामान्यांच्या हाती होते. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रेशन दुकानात किडे पडलेले, अळ्या झालेले, बुरशी लागलेले, बारीक दगड, मातीमिश्रित धान्य वाटप होत असल्याचे समोर आले आहे.धान्य निकृष्ट दर्जाचे असून जनावरांनाही खायला देणे धोक्याचे आहे.



    दुकानातील धान्यांची अनेक पोती किड्यांनी भरलेली आहेत.याबाबत संबधित दुकानदारांना विचारणा केल्यास ‘आमच्या घरात पिकते का, न्यायचे असेल तर न्या नाहीतर जा’, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. या विषयाबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेऊन लोकांना चांगले धान्यपुरवठा करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.

    तालुका पुरवठा अधिकारी बाळासाहेब सवदे यांनी सांगितले की , वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानात किडे लागलेले व मातीमिश्रित धान्य वाटप होत आहे.संबंधित धान्य तपासणीसाठी पथक पाठवून देणार आहे. निकृष्ट धान्य वाटप करू नका, अशा सूचना दुकानदारांना दिल्या आहेत.

    Sangli : Insects and soil found in ration grains

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस