विशेष प्रतिनिधी
सांगली : अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज दुपारपासून सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यावर आलेल्या दुबार पेरणीचे संकट टाळले आहे. तसेच शहरात काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने नागरिकांना कसरत करवी लागली. Sangli District rained heavily
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाची चाहूल लागताच शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र शहरात पाण्याची तळी दिसताच दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराची आठवण होताच लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात पावसाने सलामी दिली होती. त्या नंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले तर रहिवाशानी सुटकेचा निश्वास सोडला होता. यंदा शत प्रतिशत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे सबुरीने येणारा पाऊस सांगलीकर आणि कोल्हापूरकरांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
- पावसामुळे शेतकरी राजा सुखावला
- शहर आणि उपनगरात पावसामुळे धास्ती
- शहरात पाण्याची तळी, रहिवाशांची कसरत
- दोन वर्षांपूर्वीच्या महापुराच्या आठवणी ताज्या
- लोकांच्या काळजाचा ठोका चुकला
- शत प्रतिशत पाऊस पडण्याचा अंदाज
- सबुरीने येणारा पाऊस सांगलीकर आणि कोल्हापूरकरांच्या पथ्यावर