विशेष प्रतिनिधी
सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये आला आहे.सांगली शहरातील अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. सांगलीतील उपनगरातील १०० घरांमध्ये पुराचं पाणी शिरल आहे.Sangli district again In the shadow of the flood
सूर्यवंशी प्लॉट, कर्णाळ, रोड दत्तनगर परिसर या भागातील जवळपास शंभर घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या भागातील लोक अन्य ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.२०१९ च्या महापुराच्या कटू आठवणी लक्षात घेता यंदा लोकांनी अगोदरपासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी येऊ शकतं तेथील लोक अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून लोकांना वेळोवेळी योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांचं स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी माहिती दिली.
- कृष्णा पाणी पातळीत झपाट्याने वाढ
- पाण्याची पातळी आणखी दहा फूट वाढणार
- सकाळी आयर्विन पूल परिसरात पातळी ३९ फूट
- आयुर्विन पूलाची धोका पातळी ४५ फूट
- १०० घरांमध्ये पुराचं पाणी शिरले
- सूर्यवंशी प्लॉट, कर्णाळ, रोड दत्तनगरात पाणी
- या भागातील लोक अन्य ठिकाणी स्थलांतरित
- २०१९ च्या महापुराच्या कटू आठवणी जाग्या
- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज