• Download App
    Sandipan Bhumare Driver: EOW Probes 150 Crore Land Gift ​​​​​​​संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक?

    Sandipan Bhumare : ​​​​​​​संदीपान भुमरेंचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

    Sandipan Bhumare

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Sandipan Bhumare उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादच्या एका कुटुंबाने तब्बल 150 कोटींची जमीन भेट म्हणून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या प्रकरणी परभणीच्या एका वकिलाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे व त्यांचे आमदार सुपुत्र विलास भुमरे हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Sandipan Bhumare

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबातील वंशजाने संभाजीनगरची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील 3 एकर जमीन खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद रसूल यांना भेट म्हणून दिली आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 150 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. जावेद रसूल हे भुमरे कुटुंबाकडे मागील 13 वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. आमदार विलास भुमरे यांनी ‘जावेद रसूल आपले ड्रायव्हर आहेत, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आपला कोणताही संबंध नाही’, असे सांगत या प्रकरणापासून आपले अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पण सध्या त्यांच्यासह त्यांचे वडील संदीपान भुमरे व चालक जावेद रसूल या तिघांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे.



    काय आहे नेमके प्रकरण?

    हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वंशजाने जावेद रसूल यांना जालना रोडलगतचा 3 एकरचा भूखंड हिबानामा अर्थात भेट म्हणून दिला आहे. सद्यस्थितीत या जमिनीची किंमत 150 कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जात आहे. परभणीच्या एका वकिलाने या व्यवहारावर संशय व्यक्त करत गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर भुमरे पिता-पुत्रांसह त्यांच्या चालकांची चौकशी सुरू झाली. सद्यस्थितीत जावेद रसूल यांना त्यांच्या आयकर रिटर्न्सची माहिती, उत्पन्नाचे स्त्रो व त्यांच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर झाली हे स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, सालारजंग वंशज मीर मजहर अली खान व त्यांच्या 6 नातेवाईकांनी या हिबानामावर स्वाक्षरी केली आहे. सालारजंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते. त्यांचे पूर्वज निजामाच्या राजवटीत पंतप्रधान होते.

    सालारजंग कुटुंबाशी माझे चांगले संबंध -जावेद रसूल

    जावेद रसूल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे. माझे सालारजंग कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मला ही जमीन बक्षीसपत्र म्हणून दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या प्रकरणी चालक जावेदला समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले.

    हे प्रकरण आमच्याशी नव्हे चालकाशी संबंधित – विलास भुमरे

    आमदार विलास भुमरे यांनी या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण ड्रायव्हरशी संबंधिति आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माझीही चौकशी केली आहे. जावेद आमचा ड्रायव्हर असला तरी त्याच्याशी संबंधित गोष्टींवर आमचे नियंत्रण नाही. सालारजंग कुटुंबाशी संबंधित अनेकजण हैदराबादच्या निजामाकडे काम करत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या नावे अनेक जमिनी व संस्था आहेत.

    हिबानामा म्हणजे काय?

    हिबानामा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. त्याद्वारे एखादी व्यक्ती आपली जमीन, घर, दागिने आदी वस्तू दुसऱ्या व्यक्तीला निःस्वार्थपणे अर्थात कोणताही आर्थिक व्यवहार न करता भेट म्हणून देऊ शकते. पण हिबा देणारा सुजान असावा लागतो. त्याने स्वतःची मालकीची मालमत्ता हिबा म्हणून देणे अपेक्षित असते. विशेषतः हिबा घेणारा व्यक्ती नात्यातील, मित्र, परकी किंवा संस्था आदी कुणीही असू शकतो. पण तो हिबा स्वीकारण्यास सक्षम असला पाहिजे. हिबा दिलेली मालमत्ता अस्तित्वात असावी. ती हस्तांतरण योग्य असावी.

    Sandipan Bhumare Driver: EOW Probes 150 Crore Land Gift

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- मराठीवर अन्याय होता कामा नये ही आमची भावना; स्थानिक भाषांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न

    Uddhav Thackeray : हिंदी सक्तीच्या जीआरची 29 जूनला होळी करा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, पवारांची राष्ट्रवादीही आंदोलनात सोबत

    National School Sports : राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद