• Download App
    Samruddhi Mahamarg Tragedy: 8 Women Laborers Killed in Jalna Accident समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 ठार; ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले

    Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 ठार; ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले

    Samruddhi Mahamarg

    विशेष प्रतिनिधी

    जालना : Samruddhi Mahamarg जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवारात ही दुर्घटना घडली. या अपघातात मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.Samruddhi Mahamarg

    समृद्धी महामार्गावरील अपघातस्थळी पोलिस दाखल झालेत. जखमींना रुग्णालयात हलवल्याचे समजते. मृतातील सर्व महिला या कामगार असून, त्या बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण आणि खादगाव येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.Samruddhi Mahamarg



    कसा झाला अपघात?

    समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम सुरू होते. त्यासाठी महिला कामगार आल्या होत्या. या कामगारांची पिकअप व्हॅन जामवाडी शिवारात थांबली होती. तेव्हा नागपूरहून आलेल्या आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रकने या पिकअप व्हॅनला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सात महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावर जेवणाचे डबे, चपला आणि इतर साहित्य व रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता.

    मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची दाखल घेतली असून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.

    Samruddhi Mahamarg Tragedy: 8 Women Laborers Killed in Jalna Accident

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना दिलासा

    Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे- पटेल यांच्या पदांचा उल्लेख टाळल्याने चर्चा रंगल्या

    नरेंदर कब मिलेगा सिलेंडर??, वंचित बहुजन आघाडीचे 6 एप्रिलला महाराष्ट्रात आंदोलन