विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. नागपुरातल्या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. Samriddhi Highway: Maharashtra’s development highway leading beyond the Pune-Mumbai-Nashik Golden Triangle
महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत मोलाची भर घालणारा म्हणून हा समृद्धी महामार्ग ओळखण्यात येईल. किंबहुना पुणे – मुंबई – नाशिक गोल्डन ट्रँगलच्या पलिकडे महाराष्ट्राच्या विकासाला नेणारी एक समृद्ध वाट या जाणारी महामार्गाच्या रूपाने खुली होणार आहे. विलासराव ते देवेंद्र ही राजकीय वाटचाल देखील समृद्धी महामार्गाने पाहिली आहे.
असा असेल समृद्धी महामार्ग
- मुंबई ते नागपूर हे 701 किलोमीटर अंतर अवघ्या काही तासांत पार होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी उपराजधानी नागपूरला जोडताना त्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अर्थपूर्ण रीतीने जोडला जाणार आहे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
- 10 जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग जात असून हा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथील जनजीवनात समृद्धी आणणारा महामार्ग असेल.
- विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस या दोन मुख्यमंत्र्यांनी या समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले आणि ते आपापल्या कारकिर्दीत विशिष्ट टप्प्यांवर पूर्णत्वास आणले. विलासरावांनी मुख्यमंत्री असताना या महामार्गाची कल्पना पहिल्यांदा मांडली आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लावली आणि उपमुख्यमंत्री असताना प्रत्यक्षात आणली.
- या महामार्गाचे 16 उपविभागात भाग करून काम पूर्ण केले. कोणत्याही गावाला शहराला या महामार्गाची अडचण ठरू नये, यासाठी याचा मार्ग माळावरून, गावाला वळसा घालून काढला आहे.
- सुरुवातीला नगर, नाशिक बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी द्यायला नकार दिला होता. प्रकल्पग्रस्तांची अडचण हा त्यातला मुख्य मुद्दा होता.
- मात्र फडणवीस सरकारने 24 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून मोबदल्याचे पैसे जमा केले आणि त्यामुळे शेतकरी विरोध मावळला. त्यांनी जमीन हस्तांतरित केली.
- तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लँड सेक्युरिटी डायजेशनची संकल्पना मांडली. याअंतर्गत शासनाची नेपियन सी रोड ची जागा, वांद्रे येथील जागा, कफ परेड येथील जागा एमएसआरडीसीच्या नावे करण्यात आली आणि याची तब्बल किंमत 50000 कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली.
- सरकारने ही जमीन बँकांकडे सेक्युरिटायझ करायची आणि त्या मोबदल्यात बँकांनी 25000 कोटी रुपयांची रक्कम सरकारला द्यायची. ही जमीन केवळ तारण हमी म्हणून बँकांकडे राहील मात्र प्रत्यक्ष ताबा हा सरकारकडेच राहील असे ठरविले.
- सुरुवातीला या महामार्गाचे नाव कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे असे होते. परंतु या महामार्गामुळे महाराष्ट्रात शेती व्यवसायाला फायदा होणार, नाशिक, पुणे यांच्याबरोबरच आता विदर्भातला शेतीमाल देखील मुंबईत पोहोचणार आणि यामुळे देशात समृद्धी येणार म्हणून या महामार्गाचे नाव समृद्धी महामार्ग केले.
- या महामार्गामुळे अनेक पर्यटन स्थळे जोडली आहेत. यात प्रामुख्याने लोणारचे सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, गजानन महाराज शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, देवगिरी किल्ला ही पर्यटन स्थळे महामार्गाच्या नजीक येणार आहेत.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य –
- महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे. कमाल गती घाटात प्रतितास 100 किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.
- यामुळे नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक 8 तासात आणि मालवाहतूक 16 तासात शक्य होईल.
- राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणारा हा 6 पदरी महामार्ग जातो.
- नागपूर मधील मिहान शी अनेक जिल्हे जोडले जाणार. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुक वाढीची अपेक्षा
- नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर कुठल्याही प्रकारचे टोलनाके असणार नाहीत. मात्र या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या शहरांसाठी आगमन निर्गमन द्वारे आहेत. त्या ठिकाणी 24 टोलनाके आहेत.
- महामार्गावर 17 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणी शेतीला पूरक उद्योग असतील औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असणार आहेत.
- एका कृषी समृद्धी केंद्रात 30 ते 60 हजार प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. भविष्यकाळात 15 ते 20 लाख नवीन रोजगार संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीची संधी; 5000 जागा उपलब्ध; उद्या रोजगार मेळावा
- लव्ह जिहादचे वाढते मामले; विश्व हिंदू परिषदेने जारी केली तब्बल 400 केसेसची यादी
- मुंबईत आज महारोजगार मेळावा; बँकिंग, इंजिनीअरिंग, पर्यटन, मॅनेजमेंटमध्ये 7000 पदे उपलब्ध
- ठाकरेंना घरातलीच महिला मुख्यमंत्री करायचीय, नवनीत राणांचा टोला; पण मराठी माध्यमांनी लावली तिघींमध्ये स्पर्धा!!