नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित नवाब मलिकच्या दाव्यानंतर आता एक काझी समोर आले आहेत. समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या काझी मुझम्मील अहमद यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा आहे. लग्नाच्या वेळी संपूर्ण कुटुंब मुस्लिम होते. sameer wankhede nikahnama is true says kazi muzammil ahmed on nawab malik tweet
वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित नवाब मलिकच्या दाव्यानंतर आता एक काझी समोर आले आहेत. समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या काझी मुझम्मील अहमद यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी शेअर केलेला निकाहनामा खरा आहे. लग्नाच्या वेळी संपूर्ण कुटुंब मुस्लिम होते.
काझी मुजम्मील अहमद म्हणाले की, मी निकाह पढला होता, निकाहनामा अगदी बरोबर आहे. त्यावेळी समीर, शबाना (कथित पहिली पत्नी), वडील सर्व मुस्लिम होते. काझी म्हणाले, ‘समीर हिंदू असता तर लग्न झाले नसते. कारण शरियतनुसार असे होऊ शकत नाही. काझी शरियतच्या विरोधात जाऊन निकाह पढत नाहीत. आज ते काहीही म्हणतील, पण समीर त्यावेळी मुस्लिम होता.”
काझी म्हणाले की, 2006 मध्ये एका मोठ्या ठिकाणी निकाह झाला होता, ज्यामध्ये अनेक हाय प्रोफाईल लोकांसह सुमारे 2 हजार लोक उपस्थित होते. काझींनी सांगितले की, व्यवस्था झाल्यानंतर ते निकाहसाठी पोहोचले होते, त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत निकाह पार पडला. समीर वानखेडे यांचा निकाह पूर्णपणे इस्लामिक पद्धतीने झाल्याचा दावा करण्यात आला.
नवाब मलिक यांनी शेअर केला ‘निकाहनामा’
याआधी नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी समीर वानखेडे यांचा कथित निकाहनामा प्रसिद्ध केला होता. नवाब मलिक यांनी लिहिले, ‘वर्ष 2006 मध्ये, 7 डिसेंबर रोजी गुरुवारी रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्यात विवाह झाला होता. हा विवाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे पार पडला.
मलिक आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, “लग्नात 33 हजार रुपये मेहर म्हणून दिले होते. यात साक्षी क्रमांक २ हा अझीझ खान होता. तो यास्मिन दाऊद वानखेडेचा नवरा असून त्या समीर दाऊद वानखेडेची बहीण आहेत.”
क्रांती रेडकर काय म्हणाल्या?
मलिक यांच्या दाव्यांबाबत विचारले असता समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी सांगितले की, हे खोटे आहेत. मी आणि समीर जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही दुसरा कोणताही धर्म स्वीकारला नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केले. माझ्या सासूबाई आता या जगात नाहीत.”
sameer wankhede nikahnama is true says kazi muzammil ahmed on nawab malik tweet
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेसला विजयी करा – नितीन बानगुडे पाटील
- AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….
- पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ
- अमृता फडणवीस यांचे दिवाळी निमित्ताने खास गाणे; सोशल मीडियावर गाण्याच्या ओळी पोस्ट शेअर