विशेष प्रतिनिधी
मुंबई : संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू, राजू शेट्टी हे महान घराण्यातले लोक आहेत. या नेत्यांनी काढलेल्या तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमचे काय होणार याची भीती वाटत आहे, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी त्यांच्या तिसऱ्या आघाडीची सांगलीतल्या पत्रकार परिषदेत खिल्ली उडवली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संभाजीराजे यांनी शरद पवारांना टिंगल करण्याचा अधिकार आहे, असे सांगत महात्मा गांधींच्या एका वक्तव्याचा त्यांना हवाला दिला होता. मात्र, हेच संभाजीराजे मुंबई समुद्रातल्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावर भाजपवर भडकले. Sambhji raje soft on sharad pawar
शरद पवारांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. पण महात्मा गांधी असे म्हणायचे सुरुवातीला ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंतर टिंगल करतील. मग ते तुमच्याशी लढतील, पण तरीही तुम्ही जिंकाल, अशा शब्दांची आठवण संभाजीराजे यांनी पवारांना करून दिली.
समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावर मात्र संभाजीराजे भाजप वर संतापले. त्यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मान्यता मिळाल्यानंतर पहिला राजकीय उपक्रम म्हणून संभाजीराजे यांनी समुद्रातील शिवस्मारकाच्या बद्दल आंदोलनाचा पवित्रा घेतला. 100 बोटी घेऊन संभाजी राजेंचे पक्ष कार्यकर्ते समुद्रात नेमकी शिवस्मारकाची जागा कुठे आहे?? पंतप्रधान मोदींनी 2016 मध्ये कुठे भूमिपूजन केले होते??, ते शोधायला जाणार होते.
मात्र पोलिसांनी संबंधित आंदोलनाची पोस्टर्स लावायला कार्यकर्त्यांना प्रतिबंध केला. गुरव नावाच्या एका पोलीस निरीक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्याला मारले हे सगळे भाजप मुद्दामून घडवून आणत आहे, असा आरोप संभाजीराजे यांनी केला. त्याचवेळी त्यांनी आंदोलन पुढे नेण्याचा निर्धारही व्यक्त केला.
Sambhaji raje soft on sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार, 15-16 ऑक्टोबरला SCO बैठकीत सहभागी होणार
- NCP : पवारांचा पक्ष लढवणार 80 ते 85 जागा; इच्छुकांच्या मुलाखती घेणार 24 नेत्यांचे पार्लमेंटरी बोर्ड!!
- Siddaramaiah : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यानंतर MUDA घोटाळ्यात आणखी एक काँग्रेस मंत्री अडकले
- Israel Iran war : इस्रायल-इराण युद्धादरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने दिली मोठी धमकी