विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : तिसरी आघाडी अर्थात परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये त्यांचा पहिला महामेळावा घेतला. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मनोजराव, आता कुणाला भेटू नका. विश्रांती घ्या, असा सल्ला संभाजीराजे यांनी जरांगे यांना दिला. Sambhji Raje
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर ते छत्रपती संभाजी नगरच्या एका खासगी होणाऱ्या उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी संभाजी राजे यांच्यासह तिसऱ्या आघाडीचे नेते जरांगे यांना भेटले. संभाजी राजे यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत सामील व्हावे यासाठी तिसऱ्या आघाडीतल्या नेत्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आजची भेट होती.
परंतु या भेटीमध्ये संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांना आता कुणाला भेटू नका. फक्त विश्रांती घ्या आणि या तब्येत सांभाळा, असा सल्ला दिला.Sambhji Raje
Hindu go back : ‘हिंदूंनो परत जा…’, कॅलिफोर्नियातील BAPS मंदिरात द्वेषपूर्ण संदेश लिहून तोडफोड
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याच्या आदल्या दिवशी मंगळवारी मध्यरात्री 12.00 वाजता शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी त्यांची अचानक अंतरवाली सराटी येथे भेट घेतली होती. टोपे काहीवेळ जरांगे यांच्याजवळ स्टेजवर जाऊन बसले होते. त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगेंच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जरांगे यांनी उपोषण सोडले. राजेश टोपे यांच्या भेटीच्या आधी दोनच दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.
मात्र, संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हायचे आवाहन केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी शरद पवारांचे निकटवर्ती राजेश टोपे मध्यरात्री जरांगे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे त्यांच्या भेटीमध्ये नेमके कोणते राजकारण शिजले याविषयी संशयाचे मळभ गडद झाले. त्या पाठोपाठ संभाजीराजे यांच्यासह तिसऱ्या आघाडीतल्या नेत्यांनी पुन्हा एकदा जरांगे यांची भेट घेतल्याने त्यांना आपल्या आघाडीत खेचण्यासाठी महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून आले.Sambhji Raje
Sambhji raje and third front leaders meet manoj jarange again
महत्वाच्या बातम्या
- Heavy rains : राज्यभरात पावासाचं धुमशान! अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळला
- PMRDA मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Divorce case : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास पोटगीचा हक्क नाही; घटस्फोटाच्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय
- Amit Shahs : ‘दहशतवादापासून मुक्तीसाठी मतदान करा’ ; अमित शाह यांचे जम्मू-काश्मीरच्या मतदारांना आवाहन