विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू असताना माजी खासदार संभाजीराजे Sambhji raje आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात तिसरी आघाडी होऊन ती मैदानात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण हे सगळे घडते आहे, शाहू महाराज कोल्हापूरातून काँग्रेसचे खासदार झाल्यावर!! याचा अर्थ आपले राजकारण साधून घेतल्या नंतर या हालचाली सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुतीकडून सत्ता घेचून घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वंचित, मनसे यांनी आपली वेगळी चुल मांडली आहे. अशात आता छत्रपती संभाजी राजे यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्याच वेळी मनोज जरांगे यांच्या बरोबर याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे युती आणि आघाडीला राज्यात पर्याय देण्याची रणनीती संभाजी राजेंनी आखल्याचे बोलले जात आहे.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या- कर शून्य असावा, पण अनेक आव्हाने आहेत, संशोधनासाठीही निधी लागतोच
तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे पाटील यांनी यावे यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझे उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला कुठलीच अडचण नाही असे ते म्हणाले. शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणासाठीच आम्ही दोघे लढत आहोत. त्यामुळे त्यांना नेहमी सहकार्य आहे. मनोज जरांगे यांच्याशी लवकरच राजकीय चर्चा देखील होईल. राज्यातील आगामी निवडणुकीच्या तोंडावर एका नव्या पर्यायाची सुरुवात करत असल्याचे संकेतही त्यांनी या माध्यमातून दिले आहेत. समविचारी संघटनांनाही बरोबर घेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाच्यावतीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले जातील. याबाबत लवकरच बैठक होईल. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी ही नाकारता येत नाही असे ते म्हणाले. पंढरपूरचे अभिजीत पाटील हे लोकसभेला दुसरीकडे गेले होते. त्यांना आपण स्वराज्य पक्षाची ऑफर दिली आहे. आता त्यांनी ठरवायचे आहे, असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते.
Sambhji raje and manoj jarange to form third front
महत्वाच्या बातम्या
- Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल!
- Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!
- Arvind Kejriwal : न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ!
- S Jaishankar :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एस जयशंकर यांचे वक्तव्य, म्हणाले…