प्रतिनिधी
नाशिक : यंदाचा संभाजी राजे छत्रपतींचा वाढदिवस नाशिकमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी संभाजी राजे यांनी शक्तीप्रदर्शन करत एक मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावण्याचा निर्णय घेत, स्वराज्य संघटना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. Sambhajiraje’s big announcement; Loksabha election contest from Nashik
शनिवारी नाशिकमध्ये एकाबाजूला भाजप समर्पण दिनानिमित्ताने मेळाव्याचे आयोजन केले असताना दुसरीकडे संभाजी राजे यांनी वाढदिवसानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करत आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी ते म्हणाले की, आता मी चळवळीत काम करून थकलो आहे.
त्यामुळे आता बस्स झाले. स्वराज्य संघटना आता १०१ % राजकारणात येणार आहे. आता २०२४ हेच निश्चित ध्येय असणार आहे. स्वराज्य संघटना आता सत्तेत असणार हे निश्चितच, यासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवरायांचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा.
महत्त्वाचे म्हणजे संभाजी राजे यांनी कोणत्या पक्षासोबत सत्तेत असणार याचा उल्लेख न करता सस्पेन्स ठेवला आहे. त्यामुळे आता स्वराज्य संघटना कोणत्या राजकीय पक्षासोबत लोकसभा निवडणुकीसाठी युती करणार याची चर्चा सुरू झाली आहे. संभाजी राजेंचा मोठ्या उत्साहात शनिवारी वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संभाजीराजेंची पेढे आणि ग्रंथ तुला करण्यात आली.
Sambhajiraje’s big announcement; Loksabha election contest from Nashik
महत्वाच्या बातम्या
- अल निनोमुळे भारताच्या मान्सूनवर संकट : या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला इशारा
- पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत होणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
- तुर्कस्तान-सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 29 हजारांच्या पुढे, संयुक्त राष्ट्राने वर्तवला 50,000 मृत्यूंचा अंदाज