प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात याच्या 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इरादा राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजे यांनी बोलून दाखवला आहे. 26 फेब्रुवारी जवळ येत चालल्या नंतर संभाजीराजे यांच्या कुपोषणाच्या इराद्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.Sambhaji Raje’s fast should be for Maratha reservation, not for his own MP
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संभाजीराजे यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. खासदार संभाजी राजे यांनी उपोषणाचा इरादा जाहीर केला आहे. त्यांचे उपोषण मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी जरूर असावे. ते कायम ब्रेक के बाद आंदोलने करत असतात. आंदोलन करतात. थांबतात. विषय बाजूला गेले की पुन्हा आंदोलन करतात. त्यामुळे आता त्यांनी मराठा समाजासाठी जरूर उपोषण करावे परंतु ते उपोषण स्वतःच्या खासदारकीसाठी असू नये, एवढेच माझे म्हणणे आहे, असे नितेश राणे म्हणाले.
– संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण!!
मराठा आरक्षण आणि मराठा समाज या विषयाच्या पाच-सहा मागण्यांसाठी संभाजी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे हे येत्या 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत नुकतीच त्यांनी ही घोषणा केली होती. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्या आणि आमच्या मोजून 5 – 6 असलेल्या मागण्या पूर्ण करा, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला केले. आत्तापर्यंत मी मराठा समाजासाठी आक्रमक होतो. परंतु, आता उद्विग्न झालो आहे, असे ते म्हणाले होते.
5 मे 2019 रोजी मराठा आरक्षण रद्द झाले. त्यानंतर सरकारकडे मी अनेकदा मागण्या केल्या. पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली. परंतु ही मागणी देखील विलंबाने पूर्ण करण्यात आली. सध्या सुप्रीम कोर्टात या आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिकेचे स्टेटस काय आहे?, याची आम्हाला माहिती नाही. याखेरीज देखील सरकारकडे मराठा समाजाने पाच-सहा मागण्या केल्या आहेत. परंतु त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे उद्विग्न होऊन मी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहे, असे संभाजीराजे यांनी जाहीर केले. आरक्षण ओबीसी समाजाचा म्हणजे आता कशातूनही द्या पण टिकणारे आरक्षण द्या ही मराठा समाजाची मुख्य मागणी आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
मराठा मोर्चा समन्वयकांनी मला टोकाची भूमिका घेऊ नका असा आग्रह धरला. टोकाची भूमिका घेण्याची माझी इच्छा नाही. परंतु राज्य सरकार काहीच हालचाल करत नसल्याचे मला दिसल्याने मी उपोषणाचा निर्णय घेतल्याचे संभाजीराजे म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी संभाजी राजे यांचे उपोषण मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी असावे. स्वतःच्या खासदारकीसाठी नसावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sambhaji Raje’s fast should be for Maratha reservation, not for his own MP
महत्त्वाच्या बातम्या
- शिमोग्यात शाळा आणि कॉलेज पाच दिवस बंद; बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर निर्णय
- वारणाकाठ गहिवरला : हुतात्मा वीरजवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप
- केसीआर मुंबई दौऱ्याचा परिणाम काय? तेलंगणात भाजप एक नंबर वर जाय!!; फडणवीस यांचा टोला
- नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांची सारवासारव, काँग्रेसही महाआघाडीत, म्हणाले- त्यांना एकत्र घेण्याबाबत यापूर्वीही बोललो!
- “राष्ट्रीय” राजकारणाचा नुसताच आव; खरा तर हा राजकारणाचा “स्थानिक” डाव!!
- संजय राऊत नागपूरच्या फेऱ्या वाढवणार; कोणाला टेन्शन देणार…??