• Download App
    छ. संभाजी राजांचा राज्य सरकारला इशारा, 25 ऑक्टोबर पासून राज्यभर मराठा आरक्षण दौरा | Sambhaji Raje says if Government does not take decision regarding maratha reservation, we will start our campaign soon

    छ. संभाजी राजांचा राज्य सरकारला इशारा, 25 ऑक्टोबर पासून राज्यभर मराठा आरक्षण दौरा

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : भाजप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर २५ ऑक्टोबर पासून पुन्हा आरक्षण दौरा काढला जाईल असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

    Sambhaji Raje says if Government does not take decision regarding maratha reservation, we will start our campaign soon

    संभाजीराजे म्हणाले की, “सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाही. सारथी मुद्दा सोडला तर इतर कुठल्याही मुद्द्यावर दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही.” कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी अशी टीका केली.

    राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नसल्याचा आरोप संभाजीराजांनी केला.” सोलापूर, पनवेल, रायगडपासून उस्मानाबाद आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दौरे करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. शिक्षणात ओबीसींना आरक्षण दिले गेले नाही. त्याचबरोबर नांदेड मध्ये झालेल्या सभेनंतर त्यांनी पत्र लिहिले होते आणि कोरोनाचे कारण सांगून ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे आम्ही आरक्षण दौरा पुन्हा सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी केला.


    दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांना शेतकरी आंदोलकांनी परत पाठवले!!


    संभाजी राजे पुढे म्हणाले की, “मी केलेल्या पत्र व्यवहाराला उत्तर दिले नाही. त्याचप्रमाणे सकारात्मक कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता परत दौरे सुरू करायला हवेत.”संभाजीराजे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये मांडली व त्यानंतर आयोग स्थापन करून आरक्षण सुनिश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती. सामाजिक मागास घोषणेच्या बाबतीत सरकारकडून काय तयारी केली गेली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

    ते पुढे म्हणाले की, साताऱ्याची आणि कोल्हापूरची गादी यामध्ये कुठलेही मतभेद नसून उदयनराजे काय म्हंटले हे त्यांना माहीत नाही. उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाची मशाल योग्य माणसाच्या हातात नाही अशी टीका केली होती. यावरूनच संभाजीराजे यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.

    Sambhaji Raje says if Government does not take decision regarding maratha reservation, we will start our campaign soon

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस