प्रतिनिधी
नाशिक : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवबंधन बांधण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑफर नाकारून संभाजीराजे हे कोल्हापूर कडे रवाना झाल्याची बातमी आहे. यातून संभाजीराजे यांनी शिवसेनेचा दुसऱ्या जागेचा मार्ग मोकळा केला आहे की भविष्यातील राजकीय कोंडी केली आहे??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे Sambhaji Raje rejects CM’s offer and goes to Kolhapur
ठाकरे -“पवार यांच्या शब्दांच्या देवाणघेवाणीत संभाजीराजे यांची “अपक्ष” उमेदवारी अजूनही अडचणीत आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारून शिवबंधन बांधले असते तर आजचा उमेदवारीचा पेच सुटला असता. परंतु आता संभाजीराजे यांनी काही विशिष्ट राजकीय खेळी करत आणि हेतू मनात ठेवून शिवसेनेची ऑफर नाकारल्याचे समजते. आता शिवसेनेने आधी ठरवल्याप्रमाणे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी स्वतंत्र उमेदवार देणार की संभाजीराजे यांना पुरस्कृत करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण त्याचबरोबर संभाजीराजे यांची सध्या केलेली कोंडी भविष्यात शिवसेनेला कोणती राजकीय किंमत मोजावी लागणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
संभाजीराजे यांच्यासाठी अनेक मराठा संघटनांचे नेते आक्रमकपणे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. आता संभाजीराजे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही अथवा त्यांनी ती नाकारली तर त्यांची राज्यसभेची वाट खडतर आहे. या पार्श्वभूमीवर मराठा संघटना आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या बाबत नेमकी काय भूमिका घेतात संभाजीराजे यांच्यासाठी जी आक्रमक भूमिका स्वीकारली होती ती किती कायम ठेवतात?? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी वरचा सस्पेन्स मात्र कायम आहे.
Sambhaji Raje rejects CM’s offer and goes to Kolhapur
महत्वाच्या बातम्या