• Download App
    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात कोल्हापूरला मोर्चाने, मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय देणार, संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा Sambhaji Raje Chhatrapati announces that the agitation for Maratha reservation will start with a march in Kolhapur, even if he dies will give justice to the Maratha community.

    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात कोल्हापूरला मोर्चाने, मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय देणार, संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात येत्या 16 जून रोजी मराठा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून मोर्चा काढून होणार आहे. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. Sambhaji Raje Chhatrapati announces that the agitation for Maratha reservation will start with a march in Kolhapur, even if he dies will give justice to the Maratha community.


    प्रतिनिधी

    रायगड: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात येत्या 16 जून रोजी मराठा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून मोर्चा काढून होणार आहे. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

    348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलन करणार आहोत. 16 जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल. आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.

    संभाजीराजे म्हणाले, लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणे आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ. पण मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही.

    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले.

    Sambhaji Raje Chhatrapati announces that the agitation for Maratha reservation will start with a march in Kolhapur, even if he dies will give justice to the Maratha community.

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!