• Download App
    Sambhaji Raje संभाजीराजे महान घराण्यातील लोकं, त्यांच्या तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली; पवारांचा सांगलीतून टोला!!

    Sambhaji Raje : संभाजीराजे महान घराण्यातील लोकं, त्यांच्या तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली; पवारांचा सांगलीतून टोला!!

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : भाजपामधून राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी स्थापन केली. या आघाडीचा राज्यातील महाविकास आघाडीला अधिक फटका बसणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सांगली दौऱ्यामध्ये संभाजीराजे आणि बाकीच्या नेत्यांना जोरदार टोला हाणला. Sambhaji Raje belongs to the great family, said pawar

    राज्यात नवीन तिसरी आघाडी तयार झाली आहे. त्याचा तुम्हाला फटका बसणार का??, असा सवाल केल्यावर शरद पवार म्हणाले केव्हाही… हे लोकं एकत्र आल्यावर परिणाम होणारच. संभाजीराजे हे महान घराण्यातील लोकं आहेत. त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता काय आपलं होणार??, या भीतीने, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.


    Modi government : मोदी सरकारची महाराष्ट्राला सर्वात मोठी भेट; मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल!


    शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली. ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा महाराष्ट्रात मुक्काम वाढला आहे. त्यांना महाराष्ट्र आवडतो असं ऐकलं. त्यांचं कोल्हापूरचं कनेक्शन आहे. सासूरवाडी आहे…? मग साहजिकच आहे. ते येतात. भाषणं करतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. विरोधी पक्ष फोडा. कायदा सुव्यवस्था यांच्या हातात आहे. ते चांगलं मार्गदर्शन करत आहेत. याचा निकाल राज्यातील दीड महिन्यात घेतील, असा टोला त्यांनी लगावला.

    मोदींनी अधिक सभा घ्याव्यात

    मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. कुणी तरी सांगत होतं की, पंतप्रधान मोदींनी 18 ठिकाणी सभा घेतल्या. 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात अधिक या, ही विनंती आहे. इथे आणखी सभा घ्या, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

    Sambhaji Raje belongs to the great family, said pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!