• Download App
    Devendra Fadnavis अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजी

    Devendra Fadnavis : अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून संभाजीराजे संतप्त; स्मारकाच्या विरोधातले वकील कोण ते त्यांनी पाहावे; फडणवीसांची सूचना!!

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या पहिल्या राजकीय मोहिमेला प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी शिवस्मारकाचे भूमिपूजन करून देखील ते स्मारक उभे राहिले नाही म्हणून संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला, पण या स्मारकाच्या विरोधात गेलेले वकील नेमके कोण आहेत??, हे जरा संभाजीराजे यांनी पहावे आणि त्यावर देखील बोलावे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  ( Devendra Fadnavis ) यांनी लगावला.Devendra Fadnavis

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. परंतु अजूनही त्या स्मारकाचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे संभाजीराजे संतप्त झाले. त्यांनी रविवारी अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार मग स्मारक का होत नाही?? सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून का उभा राहिला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



    कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी करोडो रूपये खर्च केले गेले. मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारकाच्या शोधसाठी मोहीम आम्ही काढली आहे. राज्यातील १३ कोटी जनतेला सरकारने उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

    स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली आहे.

    मोदींना महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे…

    आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. जिथेपर्यंत आम्हाला परवानगी आहे तिथे पर्यंतच जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चूक होत आहे. त्या ठिकाणी परवानग्या नव्हत्या तर मग ते आले का? ८ वर्षांपासून काहीच काम झाले नाही. मोदींनी महाराष्ट्र सरकारला विचारले पाहिजे. माझ्या हस्ते जलपूजन करूनही काहीच काम का केले नाही. राज्यातील जनतेची ही फसवणूक केली आहे. आज आम्ही शिवरायांच्या स्मारकाचा मुद्दा घेतला आहे. पण इंदू मिलमधल्या बाबासाहेबांच्या स्मारकाबद्दल पण हीच भूमिका आहे.

    उदयनराजे आणि मी आम्ही दोन्ही वेगळे घटक आहोत. आमचा पक्ष वेगळा आहे. ते त्यांची बाजू मांडतात मी माझी बाजू मांडत आहे. मी वेळो वेळी स्मारकाबाबत भुमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक असताना भाजपाने जलपूजन करून तेव्हा राजकारण केले होते, असा आरोप संभाजीराजे यांनी केला.

    – स्मारकाविरोधातले वकील काँग्रेसचे

    संभाजीराजे यांच्या या संतप्त भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या विरोधात काही मंडळी कोर्टात गेली. त्यांचे वकीलपत्र काँग्रेसचा अधिकृत प्रचार करणाऱ्या वकिलाने घेतले. त्याची व्यवस्थित माहिती घेऊन संभाजीराजे यांनी त्यावर देखील बोलावे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

    Sambhaji Raja enraged over Shiva monument in Arabian Sea; They should see who the advocates against the monument are; Fadnavis’ suggestion!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!