• Download App
    संभाजी महाराजांची बदनामी, गिरीश कुबेर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार|Sambhaji Maharaj's notoriety, a complaint against Girish Kuber at the police station

    संभाजी महाराजांची बदनामी, गिरीश कुबेर यांच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी +कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .Sambhaji Maharaj’s notoriety, a complaint against Girish Kuber at the police station


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

    या प्रकरणी राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांनी कुबेर यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .पवळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,



    नामवंत इतिहासकारांनी खोटी माहिती खोडून काढीत संभाजी महाराजांचा सत्य जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला हे सर्वश्रुत आहे. मग संभाजी महाराजांबद्दल अस्सल ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध असताना गिरीश कुबेर यांनी खोटी माहिती आपल्या ग्रंथात समाविष्ट का केली?

    याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. महापुरुषांविषयी खोटी माहिती देणे समाजात असंतोष निर्माण करू शकते हे एका जेष्ठ पत्रकाराला का समजू नये? कि त्यांनी ते जाणीवपूर्वक केले आहे?

    याबाबत सखोल तपास होण्याकरीता लेखक गिरीश कुबेर व पुस्तकाचे प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई होणे समाजहिताचे आहे.

    लेखकाने छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हत्येचा आरोप करुन त्यांची बदनामी केल्याचे अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी म्हटले आहे. यासाठी लेखक कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

    Sambhaji Maharaj’s notoriety, a complaint against Girish Kuber at the police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !