विशेष प्रतिनिधी
मुंबई : युतीतून भाजप बाहेर आणि शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडलेली मोठी फूट यामुळे तयार झालेला मतांच्या टक्केवारीचा डेफिसिट अर्थात घट संभाजी ब्रिगेड आणि वंचित आघाडी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी भरून काढू शकतील का? हा खरा प्रश्न आहे. Sambhaji Brigade – Vanchit Aghadi can cover the percentage loss of votes given by BJP – Shinde group
कारण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित कार्यक्रमानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इतकेच नाही तर शिंदे गट मूळ शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली आहे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी देखील त्यांच्याशी युती करू इच्छित आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पण उद्धव ठाकरे यांच्यासाठी मूलभूत प्रश्न त्या पलिकडचा आहे. तो म्हणजे भाजप आणि शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शिवसेनेसाठी तयार झालेला मत टक्केवारीचा डेफिसिट म्हणजे घट जी 25 % च्या आसपास आहे, ती घट संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती भरून काढू शकेल का?? तेवढी त्यांची मतांची टक्केवारी मूळात आहे का?? या प्रश्नाच्या वास्तववादी उत्तरातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मुंबई महापालिका आणि जिल्हा परिसरातले राजकीय भवितव्य ठरणार आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांची ताकद आणि मतांची टक्केवारी बाकी सर्व राजकीय पक्षांच्या मतांच्या टक्केवारी पेक्षा कितीतरी अधिक आहे. या संदर्भात 2019 च्या विधानसभा निवडणुकीतला मत टक्केवारीचा मुंबईतला आढावा घेतला तरी त्याची आकडेवारी पुरेशी बोलकी आणि शिवसेनेसाठी राजकीय भवितव्य स्पष्ट करणारी आहे.
वंचितमुळं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला 7 ठिकाणी फटका बसला. इम्तियाज जलील यांच्या रूपाने वंचितचा एक उमेदवार लोकसभेतही गेला. 10-12 मतदारसंघात 15 व्या फेरीपर्यंत वंचितचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र 2019 महाराष्ट्र विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने 236 जागा एकट्या लढवल्या. त्यापैकी एकाही जागेवर विजय मिळाला नाही. तरीही वंचितला 25 लाख 18 हजार 748 मतं पडली. एकूण मतदानाच्या 4.57% टक्के वंचितला मिळाली, तर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यावर याचा फायदा लोकसभेच्या 38 मतदारसंघात होईल, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीची मुंबईत किती ताकद…
विधानसभा 2019 च्या निवडणुकीची टक्केवारी
कुलाबा मतदारसंघ
भाजपा- 83.85%
काँग्रेस 38.66%
वंचित 2.82%
मुंबादेवी विधानसभा
काँग्रेस 54.87%
शिवसेना 32.85
एम आय एम 5.93%
वंचित 1.18%
वरळी विधानसभा
शिवसेना 69.14%
राष्ट्रवादी 16.91%
वंचित 5.9%
सायन कोळीवाडा विधानसभा
भाजप 42.24%
काँग्रेस 31.49%
वंचित 8.9%
मनसे 10.54%
वांद्रे पश्चिम विधानसभा
भाजप 57.11%
काँग्रेस 36.88%
वंचित 2.53%
वांद्रे पूर्व विधानसभा
काँग्रेस 30.28%
शिवसेना 25.71%
वंचित 2.3%
मनसे 8.44%
कलिना विधानसभा
शिवसेना 36.53%
काँग्रेस 32.37%
मनसे 18. 89%
वंचित 2.51%
चेंबूर विधानसभा
शिवसेना 40.15 टक्के
काँग्रेस 25.2%
वंचित 17.47%
मनसे 10.86%
मानखुर्द विधानसभा
समाजवादी 48.18%
शिवसेना 30.32%
वंचित 7.3 टक्के
घाटकोपर पुर्व विधानसभा
भाजप 57.7%
मनसे 15.59%
काँग्रेस 12.44%
वंचित ८.२७ टक्के
चांदिवली विधानसभा
शिवसेना 43.74%
काँग्रेस 43.53%
वंचित 4.52%
मनसे 3.62%
विलेपार्ले विधानसभा
भाजप 61.3%
काँग्रेस 19.7%
मनसे 13.22%
वंचित 2.78%
अंधेरी पूर्व विधानसभा
शिवसेना 42.67%
काँग्रेस 19%
वंचित 2.93%
वर्सोवा विधानसभा
भाजप 33.98%
काँग्रेस 29.69%
मनसे 4.17%
वंचित 2.13%
गोरेगाव विधानसभा
भाजप 53.34%
काँग्रेस 21.23%
मनसे 17.52%
वंचित 3.52%
चारकोप विधानसभा
भाजप 71.1%
काँग्रेस 22.64%
वंचित 1.66%
कांदिवली पूर्व विधानसभा
भाजप 63.22%
काँग्रेस 24.35%
मनसे 7.52%
वंचित 1.87%
दिंडोशी विधानसभा
शिवसेना 52.61%
राष्ट्रवादी 24.13%
मनसे 16.55%
वंचित 2.13%
जोगेश्वरी पूर्व
शिवसेना 60.86%
काँग्रेस 21.39%
वंचित 3.41%
भांडुप पश्चिम विधानसभा
शिवसेना 45.70%
मनसे 26.86%
काँग्रेस 19.29%
वंचित 4.71%
विक्रोळी विधानसभा
शिवसेना 49.8%
राष्ट्रवादी 27.32%
मनसे 12.54%
वंचित ७.१५ टक्के
मुलुंड विधानसभा
भाजप 56.46%
मनसे 19.35%
काँग्रेस 15.44%
वंचित 3.8%
वर उल्लेख केलेली सगळ्यात आकडेवारी नीट लक्षात घेतली, तर शिवसेनेच्या मतांमध्ये त्यावेळी भाजप आणि शिंदे गट यांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेची स्वतंत्र आकडेवारी त्यातही फूट पडलेल्या शिवसेनेची स्वतंत्र आकडेवारी आज उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई दिसलेले आकडे डबल डिजिट मधले आणि इतर पक्षांपेक्षा कितीही मोठे वाटले, तरी त्यातला भाजप आणि शिंदे गट यांचा आकडा आता वगळावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली, तर वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी शिवसेनेला कितपत जिंकून येण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल??, हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे.
Sambhaji Brigade – Vanchit Aghadi can cover the percentage loss of votes given by BJP – Shinde group
महत्वाच्या बातम्या
- गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री पटेलांना नवे टार्गेट; नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे; पण कसे?, ते वाचा
- ठाकरे – आंबेडकर एकत्र; महाराष्ट्रात पंचरंगी लढतीची नांदी
- सावरकरांची बदनामी : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली नाही घेत; अमित शाहांचा टोला
- नोकरीची संधी : उद्या 22 नोव्हेंबरला 71000 युवकांना नियुक्ती पत्रे; देशभर 45 शहरांमध्ये रोजगार मेळावे