प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने दावा केला आहे. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले असून यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आता याप्रकरणी निवडणूक आयोग बुधवारी निर्णय घेणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे, तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली आहे.Samata Party’s claim on Thackeray’s torch symbol Appeal to Election Commission, candidate will be given in Andheri
समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, ‘जॉर्ज यांनी 1994 मध्ये समता पार्टीची स्थापना केल्यावर 1996 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले होते. मात्र, सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात 2004 मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांचे धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले.
याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून या चिन्हावर हक्क सांगितला आहे. देवळेकर म्हणाले, अंधेरीत तगडा उमेदवार निवडला आहे. मात्र, एकाच चिन्हावर दोन उमेदवार असल्यास मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी आम्ही करत आहोत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला मंगळवारी ढाल-20 तलवारी चिन्ह दिले आहे. शिंदेंकडून ई-मेलद्वारे निवडणूक आयोगाला ढाल- 2 तलवारी, तळपता सूर्य ही चिन्हे पाठवण्यात आली होती. यातील ढाल- २ तलवार हे चिन्ह देण्यात आले. दरम्यान, चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून आम्हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले.
Samata Party’s claim on Thackeray’s torch symbol Appeal to Election Commission, candidate will be given in Andheri
महत्वाच्या बातम्या