विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आगामी काळात कोणाशीही युती करायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर किमान ५१ टक्के मते मिळविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने समर्थ बूथ अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १७ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी समर्पित करण्यात येणार आहे.Samarth booth campaign to get at least 51% of votes
भाजपाने बूथ बळकटीकरणावर सातत्याने भर दिला आहे. पाच बूथमागे एक शक्ती केंद्र प्रमुख नेमण्यात येत आहेत. स्थानिक सामाजिक समीकरणानुसार नावे निश्चित केली जातात. प्रत्येक बूथवर भाजपचे प्रमुख पदाधिकारी बैठक घेतात आणि तेथे मतदार यादीचे वाचन केले जाते. त्याची माहिती प्रदेश भाजप कार्यालयास पाठवावी लागते. प्रदेश भाजपच्या मुंबईतील कार्यालयात या संपूर्ण अभियानासाठी वॉर रूम असून तेथे ३५ जणांची टीम काम करीत आहे, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी दिली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आमच्या गाडीला यापुढे एकच इंजिन राहील, असे अलीकडेच म्हटले होते. त्यामुळे पक्षात भाजपने पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी चालविली असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेची मदत मुंबई, पुणे, नाशिक व ठाणे महापालिकेत घेतली जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
१८ ते २५ वर्षे वयोगटातील युवकांनी युवा वॉरिअर अशी पाटी हातात घेऊन सेल्फी काढायचा आणि त्यासह नोंदणी करण्याचे अभियान सध्या सुरू आहे. २५ लाख युवा वॉरिअर नोंदण्याचे उद्दिष्ट आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रितपणे लढले होते. भाजपला २५.७५ टक्के मते मिळाली होती आणि १०५ आमदार निवडून आले होते.
शिवसेनेला १६.४१ टक्के इतके मतदान झाले होते आणि ५६ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला १६.७१ टक्के मते आणि ५४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने १५.८७ टक्के मतांसह ४४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती.
मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेना-भाजप राज्यात सत्तेत एकत्र असूनही वेगवेगळे लढले होते. शिवसेनेला ८४ जागा आणि १४,४३,९६९ मते मिळाली होती. भाजपला ८२ जागा आणि १३,९२,६७६ मते मिळाली होती.
Samarth booth campaign to get at least 51% of votes
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस
- नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाला अशीही सलामी, नीरज नाव असल्यास पेट्रोल पंपावर मिळणार ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत
- हॉकीपटू वंदना कटारियाचा उत्तराखंड सरकारतर्फे सन्मान, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभागाच्या होणार ब्रॅँड अॅँम्बॅसिटर
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉँग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ