विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक कागल मधून लढवायचीच ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतलेल्या समरजीत घाटगे ( Samarjeet ghatge ) यांनी थेट पवारांसमोरच जयंत पाटलांना आज बजावले, तुम्ही मित्रासाठी माझा करेक्ट कार्यक्रम गैबी चौकात येऊन केलात. आता तुमच्या मित्राचा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी पुन्हा गैबी चौकात या!!
कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून पवारांनी तीन नेते गळाला लावले. भाजपला पवारांनी धोबीपछाड दिला. पवारांनी डाव टाकला, वगैरे बातम्या माध्यमांनी दिल्या होत्या. के. पी. पाटील आणि ए. वाय पाटील हे दोन नेते पवारांना भेटूनही गेले. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी पवारांच्या पक्षात अद्याप प्रवेश केला नाही समरजीत घाटगे यांनीच फक्त पवारांच्या पक्षात प्रवेश केला.
परंतु प्रत्यक्षात समरजित घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश त्यांनी जयंत पाटलांना जे सुनावले, त्या भाषणामुळेच गाजला. कागलचे आमदार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीवरून घाटगे यांनी जयंत पाटलांना जोरदार चिमटे काढले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच प्रवेश करतो आहे. तुम्ही गेल्या वेळी गैबी चौकात येऊन माझा करेक्ट कार्यक्रम केला होता. पण यावेळी माझ्यासाठी शेवटची सभा घेऊन तुमच्या मित्राचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही केला पाहिजे, असे समरजित घाटगे यांनी जयंत पाटलांना सुनावले. यावेळी शरद पवारांचा उपस्थित त्यांनी घाटगे यांच्या भाषणाला जोरदार दाद दिली. त्यामुळे जयंत पाटलांची गोची झाली.
Samarjeet ghatge targets jayant patil
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले