विशेष प्रतिनिधी
मुंबई : काशी विश्वनाथासह हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अमानुष छळ करून क्रूर हत्या करणाऱ्या औरंगजेबावर स्तुती सुमने उधळणाऱ्या आमदार अबू आझमींविरुद्ध विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. सर्वपक्षीय आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. विधानसभेतला हा दबाव बघून अबू आझमींनी आपले वक्तव्य मागे घेतले, पण ते वक्तव्य मागे घेताना आझमींनी हेकडी कायमच ठेवल्याचे दिसून आले. औरंगजेबाला त्यांनी “औरंगजेब रहमतुल्ला आलेह” असे संबोधले. वेगवेगळ्या कम्युनिस्ट इतिहासकारांनी औरंगजेबाला “थोर” म्हणल्याचा दाखला दिला.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या कारकिर्दीत भारताचा जीडीपी 24 % होता. त्याने अनेक मंदिरे बांधली 34% हिंदू औरंगजेबाच्या बाजूने होते. भारताची सरहद्द अफगाणिस्तान पर्यंत होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाचा झगडा धार्मिक नव्हता, तर तो सत्तेसाठी होता, अशी मुक्ताफळे अबू आझमी यांनी उधळली होती.
विधानसभेत आज त्यावरूनच प्रचंड गदारोळ झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय लावून धरला. त्यांनी अबू आझमी यांच्यावर सडकून टीका केली. आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवायची मागणी केली. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी शिंदे यांचे म्हणणे उचलून धरत अबू आझमी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, मंत्री उदय सामंत, नितेश राणे यांनी देखील आझमी यांचे तुफान वाभाडे काढले. सर्व नेत्यांनी अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.
आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होऊन आमदारकी रद्द होण्यापर्यंत पाळी येऊ शकते, याचा धोका लक्षात येताच अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावरून फिरवा फिरवी केली. औरंगजेबाविषयी रोमिला थापर आणि अन्य इतिहासकारांनी जे लिहून ठेवले आहेत तेच मी बोललो. मी कुठली नवी भूमिका मांडली नाही. पण आता माझ्या विरोधात लोकांनी काहूर उठवले आहे. सत्ताधारी त्या लोकांच्या बाजूने आहेत त्यांना महाराष्ट्रात वातावरण पेटवायचे आहे म्हणून मी माझे वक्तव्य मागे घेतो, अशी मखलाशी अबू आझमी यांनी केली.
Samajwadi Party MLA Abu Azmi clarifies and addresses the uproar that erupted after his stand on Aurangzeb.
महत्वाच्या बातम्या
- Dolphin भारतात पहिल्यांदाच करण्यात आले ‘रिव्हर डॉल्फिन’ सर्वेक्षण
- Hardeep Puri : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी
- पापी औरंग्याला उत्तम प्रशासक ठरवणाऱ्या अबू आझमींवर एकनाथ शिंदेंचा प्रचंड संताप; आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवायची तयारी!!
- Delhi Assembly : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी