• Download App
    राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; उद्या मोदींच्या हस्ते उद्घाटन |Salute to many revolutionaries including Savarkar from the basement revolutionary gallery in Raj Bhavan; Inauguration by Modi tomorrow

    राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

    प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मंगळवार, १४ जून रोजी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. त्यांच्या स्मरणार्थ राजभवनात गॅलरी तयार करण्यात आली. त्यामुळे ही गॅलरी मुंबईसह देशवासियांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे या कांतिकारकांच्या गॅलरी निर्मितीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अनोखे योगदान आहे.Salute to many revolutionaries including Savarkar from the basement revolutionary gallery in Raj Bhavan; Inauguration by Modi tomorrow

    सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राजभवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. त्यानंतर या भुयारात गॅलरी बांधण्यात यावी, त्यामध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी संकल्पना राजभवनाने मांडली. त्यानुसार हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.



    या संग्रहालयात वासुदेव बळवंत फडके चापेकर बंधू, सावरकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, मॅडम भिकाजी कामा, हॉटसन गोगटे आदी क्रांतिकारकांविषयी तसेच 1946 मधील नौदल क्रांती याविषयी माहिती मिळणार आहे. जेव्हा या संग्रहालयाची निर्मिती करण्याची संकल्पना राजभवनाने मांडली, त्यासाठी क्रांतिकारकांविषयी महत्वाचे संदर्भ आणि तपशीलवार माहिती उपलब्ध करून देण्याचे योगदान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केले आहे.

    Salute to many revolutionaries including Savarkar from the basement revolutionary gallery in Raj Bhavan; Inauguration by Modi tomorrow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!