Salman Khan : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडले तरी त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार हतबल झाले आहेत. अशा काळात बॉलीवूड नायक सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानने यापूर्वीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो रोजंदारी मजुरांना आर्थिक पाठबळ दिले होते. आता कोरोनाच्या दुसर्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. Salman Khan Helps Film industry 25000 daily wages Workers again amid Corona crisis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात मोठा उद्रेक सुरू आहे. महामारी सुरू झाल्यापासून जसा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला तसाच तो सिनेसृष्टीला ही बसला. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार सोडले तरी त्यावर अवलंबून असणारे हजारो कामगार हतबल झाले आहेत. अशा काळात बॉलीवूड नायक सलमान खानने मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानने यापूर्वीही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित हजारो रोजंदारी मजुरांना आर्थिक पाठबळ दिले होते. आता कोरोनाच्या दुसर्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सलमानने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
3.75 कोटी रुपयांची आर्थिक मदत
सिनेसृष्टीतील 25,000 कामगारांच्या थेट बँक खात्यात 1500-1500 रुपयांप्रमाणे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन सलमान खानने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) चे सरचिटणीस अशोक दुबे म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही आधार कार्ड, पॅनकार्ड आणि 26,000 गरजू कामगारांचे बँक तपशील फेडरेशनच्या वतीने सलमान खान यांना पाठविले होते. त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या या नावांपैकी सलमान खान यांनी 25 हजार लोकांना आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लाईटमन, स्पॉट बॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट इत्यादी एकूण 25,000 लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
मागच्या वर्षीही केली होती 15 कोटींची मदत
दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित एकूण 23,000 लोकांना 3000-3000 रुपयांची आर्थिक मदत केली होती. यानंतर त्याने दोनदा 1500-1515 रुपयांची आर्थिक मदतही केली. अशाप्रकारे सलमानने गेल्या वर्षी उद्योगाशी संबंधित गरजू लोकांना 15 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती.
अशोक दुबे म्हणतात, “बॉलिवूडमध्ये सलमान खानसारखा दुसरा कोणी नाही. सलमान खानने गेल्या वर्षीदेखील गरजू कामगारांना मनापासून मदत करून त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यास मदत केली. खास बाब म्हणजे यावेळी आम्ही विनंती केली नव्हती. परंतु कामगारांच्या मदतीसाठी सलमान खानने स्वत: पुढे येऊन मदतीची घोषणा केली आहे.”
दरम्यान, 13 मे रोजी चित्रपटगृह तसेच अनेक प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार्या ‘राधे’ चित्रपटाच्या कमाईचा एक भाग अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोरोना पीडितांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा सलमान खान फिल्म्स आणि झी एन्टरटेन्मेंट यांनी केली होती.
Salman Khan Helps Film industry 25000 daily wages Workers again amid Corona crisis
महत्त्वाच्या बातम्या
- OMG : फिल्मी सेलिब्रिटीचं लग्न अन् खर्च फक्त 150 रुपये! पाहा ‘एक विवाह ऐसा भी!’
- Bengal Violence : पूर्वनियोजित हिंसेविरुद्ध ममता सरकारने त्वरित पावले उचलावीत, RSS सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे आवाहन
- CM Stalin In Action : मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडूत कोरोना पॅकेज जाहीर, प्रत्येक कुटुंबाला मिळणार ४००० रुपये
- Underworld Don Chhota Rajan : छोटा राजन अद्याप जिवंतच, एम्स अधिकाऱ्यांची माहिती, कोरोनावर उपचार सुरू
- Alert For Bank Customers : SBI आणि HDFC बँकेच्या या सेवा आज रात्री राहणार बंद, दिवसाच उरकून घ्या महत्त्वाची कामे