• Download App
    एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार, संक्रांत गोड; महाराष्ट्र सरकारकडून 300 कोटी वितरित Salary of ST employees today

    एसटी कर्मचाऱ्यांचा आजच पगार, संक्रांत गोड; महाराष्ट्र सरकारकडून 300 कोटी वितरित

    प्रतिनिधी

    मुंबई : जानेवारी 2023 निम्मा सरला तरी पगार न झाल्याने संतापलेल्या 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आज शुक्रवारी होणार आहेत. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे त्यांची संक्रांतही इतरांप्रमाणे गोड होणार आहे. Salary of ST employees today

    जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचा-यांना पगार मिळाला नसल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान, पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

    सरकारकडून तातडीने 300 कोटी मंजूर

    सरकारकडून न्यायालयात दिलेला शब्द पाळला न गेल्याने, एसटी संघटना महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करेल, अशी नोटीस बाजावली होती. 90 हजार कर्मचा-यांमध्ये वेळेवर पगार न झाल्याने खदखद होती. त्यामुळेच सरकारने तातडीने पावले उचलत 300 कोटी रूपये वितरित केले आहेत.

    Salary of ST employees today

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!