प्रतिनिधी
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार टाळाटाळ करते आहे. ते टाईमपास करून खासदार संभाजीराजे यांना फसवत आहेत, असा आरोप करून सकल मराठा समाजाने आज कोल्हापूरात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केले.sakal maratha samaj agitates in kolhapur; slogans against thackeray – pawar govt
संभाजीराजे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा, या दृष्टीकोनातून कालच नाशिकमध्ये मराठा मूक आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली होती. पण कोल्हापूरातच आंदोलन स्थगितीच्या घोषणेला सकल मराठा समाजाने धुडकावून तासभर आंदोलन केले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन देऊन राज्य सरकार संभाजीराजे राजे यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला.
या आंदोलनात निवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप पाटील, सचिन तोडकर, सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले, महेश जाधव, दिलीप देसाई, स्वप्नील पार्टे, जयेश कदम यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे शहरातली वाहतूक विस्कळीत झाली. सरकारने आजच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास चार दिवसानंतर ही ठिणगी राज्यभर पोहोचू, असा इशारा सकल मराठा आंदोलकांनी दिला.
समरजीत घाटगे म्हणाले, ठाकरे – पवार सरकार सध्या मराठा आरक्षणात टाईमपास करीत आहे. युवकांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे उगाच आश्वासन देत वेळ घालवण्यापेक्षा सरकारने आता तातडीने मागण्या मान्य करायला पाहिजेत.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, टोकाची भूमिका घेतल्याशिवाय सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही. याची आम्हाला खात्री झाली आहे. म्हणूनच आता आम्ही राज्यभर उग्र आंदोलन करणार आहोत. त्याची आज सुरुवात कोल्हापुरात झाली आहे.
sakal maratha samaj agitates in kolhapur; slogans against thackeray – pawar govt
महत्त्वाच्या बातम्या
- बांधकाम कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी दोन कोटी रुपये देण्याचे देवेगौडा यांना आदेश
- लोकसभेत तिसरी, चौथी आघाडी कुचकामी ठरणार, भाजपला टक्कर देणे अशक्य ; रणनितीकर प्रशांत किशोर यांचे स्पष्ट मत
- आधी इंदिरा बॅनर्जी, आता अनिरूध्द बोस; ममता बॅनर्जींच्या केसच्या सुनवणीतून सुप्रिम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांची माघार
- अमरिंद सिंगांचा पत्ता कट…!!; पंजाबमध्ये काँग्रेस सोनियाजी – राहुलजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार; मल्लिकार्जुन खर्गे यांचे महत्त्वपूर्ण विधान
- पंतप्रधानांनी अश्रू गाळल्यामुळे नव्हे; तर ऑक्सिजन पुरवठ्यामुळे लोकांचे जीव वाचले असते; राहुल गांधींचे टीकास्त्र