पुण्यामध्ये सैराट चित्रपटाप्रमाणेच घटना घडली असून आई वडील भाऊ आणि नातेवाईकांनी मिळून स्वतःच्या मुलीच्या प्रियकराचा दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला वारजे मध्ये 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. Sairat story in Pune, the girl’s parents killed her boyfriend
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यामध्ये सैराट चित्रपटाप्रमाणेच घटना घडली असून आई वडील भाऊ आणि नातेवाईकांनी मिळून स्वतःच्या मुलीच्या प्रियकराचा दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केला वारजे मध्ये 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
प्रद्युमना प्रकाश कांबळे (वय 22, रा रामोशीवाडी, गोखलेनगर, सेनापती बापट रोड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी अजय विजय पायगुडे (वय 19), विजय किसन पायगुडे (वय 40), वंदना विजय पायगुडे (वय 40) आणि सागर गोविंद राठोड (वय 22, सर्व रा साई श्रद्धा रेसिडेन्सी, दांगट पाटील नगर, शिवणे) यांना अटक केली आहे. या प्रकरणी प्रद्युम्न याचा आत्येभाऊ गौरव शंकर नेटके (वय 17, रा मेहेंदळे गॅरेज समोर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी विजय आणि वंदना पायगुडे यांची मुलगी प्राजक्ता हिचे आरोप मयत प्रद्युम्न कांबळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तो या मुलीला भेटण्याकरता दांगट पाटीलनगर, शिवणे येथे आला असता आरोपींनी त्याला धारदार शस्त्रांनी वार करून तसेच सिमेंटचे गट्टू आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जागीच ठार मारले. प्रदुम्न कांबळे याच्यावर गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. तसेच कामधंदा करीत नव्हता.
आरोपी वंदना पायगुडे या स्वयंपाकाची कामे करतात आणि विजय पायगुडे हे रिक्षाचालक आहेत. आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक राम पारवे यांनी सांगितले. या खुनाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम वाढ केली आहे.
Sairat story in Pune, the girl’s parents killed her boyfriend
महत्त्वाच्या बातम्या
- कमाल तापमानात वाढ, बंगालच्या उपसागरमध्ये कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळामुळे उष्णतेची लाटेचा धोका
- वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून
- गौतम अदानी यांच्या संपत्तीत दर आठवड्याला सहा हजार कोटी रुपयांची वाढ, एलॉन मस्क, जेफ बेझोस आणि बर्नार्ड अर्नॉल्ट या तीन अतिश्रीमंतांची मिळून होईल त्यापेक्षा जास्त कमाई
- NAWAB MALIK : नवाब मलिक लवकरच देणार राजीनामा ? बिन खात्याने मंत्री ! साहेबांनी सर्व खाती घेतली काढून ; आता या नेत्यांवर जबाबदारी
- काश्मीर फाईल्स पाहिल्यावर भावुक झाली अभिनेत्री संदीपा धर, कुटुंबाला ट्रकच्या मागे लपून पळावे लागल्याची आठवण झाली ताजी