• Download App
    Sahar Sheikh's apology for going green in Mumbra, Imtiaz Jaleel threatens to make the whole of Maharashtra green मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखच्या माफी नंतर इम्तियाज जलील यांची सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी!!

    मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखच्या माफी नंतर इम्तियाज जलील यांची सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी!!

    Sahar Sheikh

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एक नगरसेवक पद काय जिंकले, तर सगळा मुंब्रा हिरवा करायला निघालेल्या सहर शेखला माफी मागावी लागली, पण तिने मागितलेल्या माफी नंतर माझी खासदार इम्तियाज जलील यांना “कंठ” फुटला आणि त्यांनी सगळा महाराष्ट्र हिरवा करायची धमकी दिली.Sahar Sheikh’s apology for going green in Mumbra, Imtiaz Jaleel threatens to make the whole of Maharashtra green

    मुंब्र्यातून सहर शेख निवडून आल्यानंतर तिने केलेल्या विजयी भाषणात जितेंद्र आव्हाड यांना टोचले. कैसा हराया!!, असे म्हणून तिने सगळा मुंब्रा हिरवा करायची भाषा केली. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी केला नोटीस काढली. त्यानंतर सहर शेखने माफी देखील मागितली. पण तिच्यावर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या पोलीस स्टेशनला पोहोचले.



    मात्र त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सगळा महाराष्ट्र हिरवा करायची भाषा वापरली. सहर शेख हिने माफी मागू नये, असे आम्ही तिला सांगितले होते. परंतु तिने माफी मागितली हे चूक आहे. तिला पोलिसांनी दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली हे आम्ही अजिबात मान्य करणार नाही. ज्यावेळी किरीट सोमय्या किंवा नितेश राणे मशिदीत घुसून मारामारीची भाषा करतात, त्यावेळी पोलीस त्यांना नोटीस का देत नाहीत??, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.

    – सहर शेखचे समर्थन

    त्या पलीकडे जाऊन इम्तियाज जलील यांनी मुंब्रा हिरवा करायच्या भाषेचे समर्थन केले. हिरवा रंग दहशतवादाचा नाही. तो हिरवळीचा रंग आहे. आम्ही सगळा महाराष्ट्र हिरवा करू, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे हिरवळ निर्माण करू, असा त्याचा अर्थ आहे, असा दावा जलील यांनी केला. AIMIM हा पक्ष फक्त मुस्लिमांचा नाही तो सगळ्यांचा पक्ष आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत म्हणून आम्ही हिंदूंना सुद्धा आमच्या पक्षातून निवडून आणले. विजय उबाळे आणि मयूर सारंग ही त्याची उदाहरणे आहेत, असा दावाही इम्तियाज जलील यांनी केला.

    Sahar Sheikh’s apology for going green in Mumbra, Imtiaz Jaleel threatens to make the whole of Maharashtra green

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून सुरुंग!!

    Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटीलांचा पोलिसांना अल्टिमेटम; आठवडाभरात नावे जाहीर करा, नाहीतर मी करतो; ड्रग्स रॅकेटमुळे पोलिस दल हादरले

    बाळासाहेबांचे शब्द उसने घेऊन वंचित बहुजन आघाडीचा भाजप + AIMIM जोडगोळीला टोला!!