विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी संपाच्या मुद्द्यावरून आमदार सदाभाऊ खोत भडकले असून या सरकारचे तेरावे घालतो की नाही ते पहा, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी वाभाडे काढले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या विषयावर राज्य सरकार महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी याविषयावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी काय भूमिका घ्यायची, यावर आता राज्य सरकार चर्चा करत आहे. Sadabhau will form the thirteenth government; Government to discuss merger of ST with Advocate General!
गेले तब्बल १३ दिवस एसटी कामगार आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. आता त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कामगारांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. अनिल जाधव नावाच्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या अधिकाधिक कामगारांना आझाद मैदानात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारचे तेरावे घालणार : सदाभाऊ खोत
एसटी कामगार आता महाविकास आघाडी सरकारचे तेरावे घालणार आहेत. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निलंबनाच्या मागणीला जोर देणार आहेत, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणतात एअर इंडिया विकणाऱ्यांनी एसटीवर बोलू नये. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, हा मोर्चा एसटीच्या कामगारांचा आहे. इतके दिवस आंदोलनाला बसलेले एसटीचे कामगार काही लहान नाहीत, असेही खोत म्हणाले. राज्यभरातून परिवहन मंत्र्यांना साडी-चोळी कुरियरने पाठवा, असे आवाहनही एसटीच्या कामगारांना करण्यात आले, असेही खोत म्हणाले.
यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनाची आम्ही आता नवीन दिशा ठरवणार आहे. कामगार अजिबात मागे हटणार नाही. हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोवर सरकार मागण्या मान्य करत नाही, तोवर काहीही झाले तरी आंदोलन सुरूच राहणार, असे पडळकर म्हणाले.
Sadabhau will form the thirteenth government; Government to discuss merger of ST with Advocate General!
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; रत्नागिरीच्या टिळक जन्मस्थान स्मारकाची दुरवस्था, कौलेही उडाली! 4.50 कोटी गेले कुठे?
- महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी; देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान
- विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती; बावनकुळे यांच्यासारखे राजकीय पुनर्वसन
- युरोपमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तडाखा, ऑस्ट्रियात लॉकडाऊन; जर्मनीमध्ये संकट
- पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरची इमारतीवरून उडी मारून लाईव्ह आत्महत्या; घटनेमुळे उडाली खळबळ