वृत्तसंस्था
मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल 45 लाख रुपयांचा सौदा करण्यात आला होता, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हत्येचा कट पोलीस मुख्यालयात रचला Sachin Waze paid Rs 45 lakh to Pradip Sharma for killing Mansukh Hiren
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची झालेली हत्या, या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
प्रदीप शर्मा यांनी जामीन अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला. त्यावर बुधवार, 4 मे रोजी सुनावणी झाली. त्यावेळी एनआयएने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाख रुपयांचा सौदा झाला होता, असा धक्कादायक खुलासा केला.
या प्रतिज्ञापत्रात एनआयएने हा हत्येचा कट पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच रचला होता, असे म्हटले आहे. तसेच सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे.
Sachin Waze paid Rs 45 lakh to Pradip Sharma for killing Mansukh Hiren
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!
- चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट
- Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन
- पोलीसांनी राज ठाकरे यांना बजावली नोटीस, कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा