विशेष प्रतिनिधी
मुंबई – राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अटक केलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे आणि पोलिस अधिकारी रियाझुद्दीन काझी यांच्या बडतर्फीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. कलम ३११ अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे दोन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणार आहेत. Sachin waze, Kazi will sufer strict action
दोन्ही अधिकाऱ्यांमुळे मुंबई पोलिस खात्याची मोठी बदनामी झाली. त्यांचे कार्य पोलिस अधिकाऱ्याला शोभणारे नाही, तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाचा प्रभारी असलेल्या वाझेला १३ मार्च रोजी ‘एनआयए’ने अटक केली होती; तर त्याचे सहकारी रियाझुद्दीन काझीला ११ एप्रिलला अटक करण्यात आली होती. दोन्ही अधिकारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांचाही या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात सक्रिय सहभाग आढळल्याचे ‘एनआयए’ने म्हटले आहे.
उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या ‘अँटिलिया’समोर स्फोटकांनी भरलेली मोटार ठेवल्याच्या प्रकरणानंतर वाझे आणि काझी यांना अटक करण्यात आली. नियमानुसार दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आता पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली..
Sachin waze, Kazi will sufer strict action
विशेष बातम्या
- 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!
- पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा ; देवेंद्र फडणवीस
- बांधकाम मजुराची बायको भाजपामुळे बनली आमदार, झोपडीत राहणाऱ्या चंदना बाऊरी यांचा विजय
- Belgaum Bypoll Result Live : बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय ;काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराभव