वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या काळातल्या 100 कोटींच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचेही नाव समोर आले आहे. अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे. याचे पुरावे सीबीआय कडे दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले, असा गौप्यस्फोट सचिन वाझेने केला. Sachin waze Jayant Patil, Anil Deshmukh name is also named in the recovery of 100 crores
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातल्या आरोप- प्रत्यारोपात आता महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर आली. मुंबईचे निलंबीत पोलीस अधिकारी आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला. 100 वसुली प्रकरणात सचिन वाझेने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचेही नाव घेतले.
100 कोटींच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. या प्रकरणातले पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिले. फडणवीसांना लिहलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचे देखील नाव घेतले. वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
जयंत पाटलांवर नेमके आरोप काय?
सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय लिहिले या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या पत्रात सचिन वाझेंनी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आगे. या पत्रातच अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केले आहेत. पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल.
सचिन वाझेचे गौप्यस्फोट
- फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचेही नाव लिहलंय
- अनिल देशमुखांना पी ए मार्फत पैसे दिले जायचे
- मी जे बोलतोय, त्याचे सारे पुरावे आहेत,सीबीआयकडेही पुरावे आहेत
- फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात मी सारे पुरावे दिले.
- माझी नार्को करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे.
Sachin waze Jayant Patil, Anil Deshmukh name is also named in the recovery of 100 crores
महत्वाच्या बातम्या
- Dharmaraobaba atram : पक्ष आणि घरफोडीवरून धर्मरावबाबा अत्राम पवारांवर बरसले, पण प्रफुल्ल पटेल पवारांना सावरायला धावले!!
- पोस्टरवरचे मुख्यमंत्री “खाली” आले; पण स्वतःच्याच मंत्रिपदाची घोषणा करून बसले!!
- Kangana Ranaut :’राहुल गांधींच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो’, कंगना रणौत यांनी लगावला टोला!
- Paris Olympics : हॉकीमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभव