Sachin Vaze : अँटिलिया प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी अनेक रहस्ये समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) सूत्रांनी सांगितले की, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक कार ठेवल्यानंतर सचिन वाझे 2 जणांची बनावट चकमक करण्याची तयारी करत होते. जेणेकरून स्फोटके ठेवल्याचा दोष त्यांच्यावर ठेवता येईल. वाझे यांच्या घरातून पासपोर्ट मिळाल्यानंतर तपास यंत्रणा एन्काउंटर अँगलचा तपास करत आहे. Sachin Vaze Real Plan Reveled By NIA in Antilia Case, Fake Encounter Angle in NIA Probe
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अँटिलिया प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी अनेक रहस्ये समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) सूत्रांनी सांगितले की, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक कार ठेवल्यानंतर सचिन वाझे 2 जणांची बनावट चकमक करण्याची तयारी करत होते. जेणेकरून स्फोटके ठेवल्याचा दोष त्यांच्यावर ठेवता येईल. वाझे यांच्या घरातून पासपोर्ट मिळाल्यानंतर तपास यंत्रणा एन्काउंटर अँगलचा तपास करत आहे.
‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, सचिन वाझे यांना पासपोर्ट धारक आणि एका अन्य व्यक्तीस संपवायचे होते आणि त्यानंतर ते जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली कार अँटिलियाच्या बाहेर ठेवण्याचा आरोप त्यांच्यावर थोपवणार होते. मुंबई पोलिसांतून निलंबित झालेले सचिन वाझे सध्या अँटिलियाबाहेर पार्क केलेल्या स्फोटक कार आणि त्याचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एनआयएच्या ताब्यात आहे.
25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही पार्क केलेली आढळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझे यांची खरी योजना अशी होती की अँटिलियाबाहेर स्फोटाकांची कार ठेवून दोन जणांना (एनआयएने त्यांची ओळख उघड केली नाही) गोळ्या घालून ठार मारायचे. यानंतर प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा सचिन वाझे करणार होते. सचिन वाझे यांच्या घरी 17 मार्च रोजी छापेमारीदरम्यान हा पासपोर्ट सापडला होता.
असे सांगितले जात आहे की, औरंगाबादहून चोरी झालेल्या मारुती इको कारला दोन जण चालवत होते. ही कार अँटिलियाच्या बाहेर पार्क केली होती. एनआयएने मिठी नदीतून या वाहनाची नंबर प्लेट जप्त केली आहे. परंतु सचिन वाझे यांना ‘प्लॅन ए’ कार्यान्वित करता आला नाही, मग त्यांनी ‘प्लॅन बी’ वापरला आणि मनसुख हिरेनची स्कॉर्पिओ वापरली.
Sachin Vaze Real Plan Reveled By NIA in Antilia Case, Fake Encounter Angle in NIA Probe
महत्त्वाच्या बातम्या
- CBSE Board Exam 2021: सीबीएसई 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर 10वीच्या परीक्षा रद्द
- अवघ्या चार दिवसांत अदानींना ९२ हजार कोटींचा फटका, शेअर बाजार गडगल्याने संपत्तीत १७ टक्के घट
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात दाखल, परमबीर सिंगांच्या आरोपांवरून चौकशी सुरू
- गुजरातमध्ये कोरोना रोखण्यासाठी चक्क यज्ञ ; सरकारी रुग्णालय, स्मशानभूमीत उपक्रम
- मुस्लिम महिलांना ‘रिव्हर्स तलाक’चे स्वातंत्र्य, हायकोर्टाने सुनावला महत्त्वाचा निर्णय