• Download App
    Rupali Chakankar's Claim: Pranjal Khewalkar's Phone Contained 1779 Obscene Photos and Videosप्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये 1779 अश्लील फोटो

    Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये 1779 अश्लील फोटो अन् व्हिडिओ; रूपाली चाकणकरांचा दावा

    Pranjal Khewalkar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Pranjal Khewalkar  पुण्यात काही दिवसांपूर्वी कथित रेव्ह पार्टीवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मानवी तस्करी झाल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.Pranjal Khewalkar

    रूपाली चाकणकर म्हणाल्या, प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी येथील घरातून जो मोबाइल जप्त केला होता त्यात सायबर तज्ञांच्या यांच्या माहितीने विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाइलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ, महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले. या मोबाइलमध्ये जे व्हॉट्सअप चॅट समोर आले त्यात एकूण 7 मुली आढळून आल्या. या सातही मुलींची नावे आरुष नावाने सेव्ह केली होती. म्हणजेच आरुष या नावाची व्यक्ती मुलींचे ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते. या चॅटवरून असे लक्षात येते की आरुष या नावाच्या व्यक्तीने मुलींना लोणावळा आणि पुणे या ठिकाणी पार्टीसाठी बोलावले होते.Pranjal Khewalkar



    मुलींना सिनेमामध्ये काम देण्याचे आमिष

    पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, पोलिसांनी छापा टाकल्या त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 25/06/2025 रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत दारू व हुक्का पार्टी सुरू होती. त्यावेळेस देखील काही मुली बोलावल्या होत्या. यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅट असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग संदर्भात संपर्क साधण्यात आला आहे. या मुलींना सिनेमामध्ये काम देतो असे सांगून बोलावल्याचे तसेच त्यांचा वापर केल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याने मुलींनी वारंवार पैशांची मागणी केल्याचे यामधून दिसून येत आहे.Pranjal Khewalkar

    ह्यूमन ट्रॅफिकिंगची शक्यता नाकारता येत नाही

    प्रांजल खेवलकर यांनी खराडीमधील हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा, साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलावून अशा प्रकारच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे मुलींचे अश्लील व्हिडिओ, या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते. काही मध्यस्थांच्या मार्फत खेवलकर यांनी पार्टीसाठी मुली पाठवल्याचे सुद्धा या चॅटमधून समोर आले आहे. तसेच या प्रकरणी मोठ्या प्रमाणात ह्युमन ट्रॅफिकिंगची शक्यता नाकारता येत नाही. प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये असलेल्या मुली या दोन वर्षांपासून संपर्कात असल्याचे दिसते. तसेच या पार्टीमध्ये अमली पदार्थ गांजा घेऊन येण्याची पूर्वकल्पना होती. त्यानुसार ही चॅट झाली असल्याचा दावा रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

    मुलींना विवस्त्र करत नशा करून लैंगिक अत्याचार

    रूपाली चाकणकर म्हणाल्या, या मोबाइल मधल्या हिडन फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले, त्यात 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये मुलींसोबत अश्लील व अश्लाघ्य कृत्य केल्याचे व्हिडिओ व फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करत नशा करून लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ करण्यात आले व त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले आहे. घरात मोलकरणीचे काम करणाऱ्या महिलेचे सुद्धा अश्लील व्हिडिओ व फोटो असल्याचे समोर आले आहे. या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी आरुष नावाचा व्यक्ती ठेवला होता.

    मुलींचे परराज्यात व्यापार करत लैंगिक अत्याचार

    एकंदरच हे सगळे प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास करण्यात आला आहे. अॅंटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे. त्यानिमित्ताने हे सगळे प्रकरण पाहिले तर मानवी तस्करी यात झाली आहे. या मुलींचे परराज्यात व्यापार करून लैंगिक अत्याचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

    बदनामीचे षड्यंत्र सुरू, पुराव्याशिवाय बोलू नका – एकनाथ खडसे

    रूपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेवर प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, मला असे वाटते की चाकणकर या चेकाळल्या आहेत. हे सगळे आरोप करत असताना जर पुरावे असतील तर पुरावे दाखवा. हा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो नारकोटिक्सच्या संदर्भात आहे. नारकोटिक्समध्ये काही सापडले की नाही, त्याने काही सेवन केले की नाही, हे सगळे कोर्ट ठरवेल दोषी आहे की नाही. गुन्हा दाखल वेगळा आहे आणि आता हे महिलांच्या तस्करीवर बोलत आहेत. चाकणकर अशा आविर्भावात बोलत आहेत की तपासाच्या त्याच अधिकारी आहेत. बदनामीचे षड्यंत्र थांबवा. त्यांच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी ऐकिवात आहेत, पण मी या गोष्टीत पडत नाही. एखाद्या गुन्ह्याचे समर्थन करणारा मी नाही. माझा जावई असेल तरी पुरावे सापडले तर फाशी लावा, पण पुराव्याशिवाय बोलू नका. राज्य महिला आयोगाकडे तक्रार आलेली नसताना बदनामी करण्याचे काम करणे सुरू आहे.

    Rupali Chakankar’s Claim: Pranjal Khewalkar’s Phone Contained 1779 Obscene Photos and Videos

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !