विशेष प्रतिनिधी
मुबंई : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण बसणार यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचे नाव चर्चेत असताना आता रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या काम करतात.
Rupali Chakankar’s name has been finalised for the Chair person of the Women’s Commission
चित्रा वाघ यांच्या “रावणाला मदत करणारी शूर्पणखा” या टीकेवर रूपाली चाकणकर यांनी दिले उत्तर
राज्य सरकारकडून अधिसूचना काढून याबाबतची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा उद्या म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या नावाविरुद्ध भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला होता. महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि महिला अध्यक्ष पद रिक्त आहे अशी टीका चित्र वाघ यांनी केली होती. आपल्या एका ट्वीटमधून त्यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्षरीत्या शूर्पणखा असे संबोधले होते. यावरुन दोघींमध्ये ट्विटर वॉर देखील झाले होते. या सर्व घडामोडींनंतर आता रुपाली चाकणकर यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.
Rupali Chakankar’s name has been finalised for the Chair person of the Women’s Commission
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना